ट्रम्पकन्या इव्हांकाला जडला सेल्फीचा छंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 21:55 IST
जगभरात चर्चेचा विषय ठरत असलेले अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या कौटुंबिक आयुष्यावरूनही बराच काळ चर्चेत होते. त्यांची ग्लॅमर ...
ट्रम्पकन्या इव्हांकाला जडला सेल्फीचा छंद
जगभरात चर्चेचा विषय ठरत असलेले अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या कौटुंबिक आयुष्यावरूनही बराच काळ चर्चेत होते. त्यांची ग्लॅमर फॅमिली या प्रचारादरम्यान आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. यावेळेस ट्रम्पकन्या इव्हांका तिच्या आगळ्या-वेगळ्या छंदामुळे चर्चेत आली आहे. इव्हांका ही तिच्या ग्लॅमर अंदाजामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. मात्र आता तिला गुगलवरही सर्च केले जात असल्याने इव्हांका सातवे आसमॉँ पे आहे. इव्हांका ही अमेरिकन बिझनेस वुमन आहे. तिची जगभरातील पॉवरफुल बिझनेस वुमन्समध्ये गणती केली जाते. फॅशन आणि मॉडलिंग जगताशीही तिचा संबंध आहे. सध्या ती तिच्या आगळ्या-वेगळ्या छंदामुळे चर्चेत आली आहे. इव्हांकाला सेल्फीची आवड असल्याने सोशल मीडियावर तिला याविषयी वारंवार विचारले जात आहे. खरं तर मुलींना सेल्फीची आवड असतेच, मात्र इव्हांकाची आवड नसून एकप्रकारचा छंदच आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या सेल्फीचा अक्षरश: ढीग आहे. यामध्ये कधी ती एकटी पाउट करताना दिसतेय, तर कधी केस कापताना सेल्फी क्लिक करते. तिच्या या सेल्फीमध्ये एक सेल्फी असाही आहे जो इव्हांकाच्या ग्लॅमरस अंदाजाबरोबरच तिचा बोल्ड स्वभाव अधोरेखित करतो. इव्हांकाने एक बेबी बंप दाखविणारा सेल्फी शेअर केला असून, तिच्या फॅन्सला तो जबरदस्त भावला आहे. सेल्फीबरोबर तिला गॅझेट्सचीही प्रचंड आवड आहे. त्यामध्ये अॅपल डिव्हाइस तिला जबरदस्त आवडतो. अॅपल, आय फोन, मॅकबूक, आय पॅडसह अनेक गॅझेट्स ती वापरते. या गॅझेट्सचे काही फोटोही तिने अपलोड केलेले आहेत. मात्र याचा अर्थ तिला आयफोन आवडतो म्हणून ती वारंवार फोन बदलत नाही. तर केवळ त्याचे कव्हर बदलून आपला छंद जोपासत असते. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये हे स्पष्टपणे दिसते.