Join us  

 काही दिवसांपूर्वी केली पॉर्न स्टार बनण्याची घोषणा, आता झाली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 1:54 PM

हॉलिवूडचे प्रसिद्ध फिल्ममेकर स्टीवन स्पीलबर्ग यांची मुलगी मिकेला नव्या वादात

ठळक मुद्देमध्यंतरी पॉर्न वेबसाइटवर शुगर स्टार माध्यमातून तिने आपले काही व्हिडीओ पोस्ट केले होते.

हॉलिवूडचे प्रसिद्ध फिल्ममेकर स्टीवन स्पीलबर्ग यांची मुलगी मिकेला हिने 23 व्या वर्षी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकत असल्याची घोषणा केली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. हीच मिकेला आता एका वादात अडकली आहे. होय, कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी मिकेलाला अटक करण्यात आली.मिकेलाचा भावी पती चक पेनको याने या घटनेला दुजोरा दिला. मात्र एका गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे त्याने स्पष्ट केले. अर्थात या घटनेबद्दल सविस्तर बोलण्यास त्याने नकार दिला.

मिकेलाला शनिवारी 29 फेबु्रवारीला सकाळी 6.30 वाजता अटक करण्यात आली. यानंतर तिला डिटेंशन सेंटरमध्ये नेण्यात आले. एका सामान्य प्रक्रियेसाठी 12 तास अटकेत राहिल्यानंंतर 1000 अमेरिकन डॉलरच्या जामीनावर तिची सुटका करण्यात आली.  

मिकेलाही स्टीवनची दत्तक मुलगी आहे. नुकतीच मिकेलाने पॉर्न स्टार बनण्याचा निर्णय जगजाहिर केला आहे. पॉर्न इंडस्ट्रीमध्ये येण्याआधीच तिने तिचे सोलो पॉर्न व्हिडीओ शूट केले होते. ‘भरपूर पैसा कमवणे हाच माझा एकमेव हेतू आहे. पैसे कमवून मला खूप श्रीमंत व्हायचे आहे. छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी मला कोणापुढे हात पसरवायचे नाहीत. त्यामुळे पॉर्न इंडस्ट्रीची निवड केल्याचे तिने म्हटले होते.पॉर्न इंडस्ट्रीत काम करण्यात काहीही चुकीचे नाही. मला माझ्यानुसार माझे आयुष्य जगायचे आहे. त्यामुळे मी कुठे आणि कसे काम करावे हा सर्वस्वी माझा निर्णय आहे, असेही तिने म्हटले होते.

मध्यंतरी पॉर्न वेबसाइटवर शुगर स्टार माध्यमातून तिने आपले काही व्हिडीओ पोस्ट केले होते. मात्र तिच्याकडे सेक्स वर्कर लायन्संस नसल्यामुळे हे व्हिडीओ काढावे लागले होते.सध्या मिकेला तिच्या लायन्संस मिळण्याची वाट बघत आहे. पैसे कमावण्यासाठी शरिराचा वापर होत नसल्याच्या विचाराने ती खूप त्रस्त झाली होती.याच कारणामुळे तिने सोलो पॉर्न प्रोड्यूस करण्याचा निर्णय घेतला होता. काही लोक माज्या शरिराला घेऊन निंदाही करत असे त्यामुळे रोज तेच ते ऐकून मी कंटाळले होते. त्यामुळे त्याच शरिराचा वापर करत मला सक्षम बनायचे असल्याचेही तिने म्हटले आहे. 

टॅग्स :हॉलिवूड