Join us

स्टेफनी डेविस घेतेय मातृत्वाचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 22:53 IST

अभिनेत्री स्टेफनी डेविस गेल्या दोन महिन्यांपूर्वीच आई झाली असून, सध्या ती मातृत्वाचा आनंद घेत आहे. स्टेफनीने म्हटले की, गेल्या ...

अभिनेत्री स्टेफनी डेविस गेल्या दोन महिन्यांपूर्वीच आई झाली असून, सध्या ती मातृत्वाचा आनंद घेत आहे. स्टेफनीने म्हटले की, गेल्या आठ आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या मुलगा केबेन-एल्बी याच्यासोबत मातृत्वाचा आनंद घेत आहे. केबेन स्टेफनी आणि तिचा बॉयफ्रेंड जेरेमी मॅककोनेल यांचे पहिलेच मूल आहे. डेलीमेल डॉट को डॉट यूकेने दिलेल्या माहितीनुसार स्टेफनीने ‘शोबीज शो’मध्ये आई होण्याच्या अनुभवाचा खुलासा केला होता. यावेळी स्टेफनीने म्हटले की, हे खरोखरच अद्भुत आहे. मुलाच्या जन्माअगोदर मी खूपच विसरभोळी होती. मी आयुष्यातील कुठल्याच गोष्टी आठवण करून ठेवत नसे. मी फक्त जगत असे; मात्र मुलाच्या जन्मानंतर माझे जगच बदलले आहे. त्याच्यासोबत व्यतीत करीत असलेला प्रत्येक क्षण मी स्मरण करून ठेऊ इच्छिते. आई होण्याचा आनंद हा खरोखरच सर्वोच्च असल्याचे स्टेफनीने सांगितले. पुढे बोलताना स्टेफनीने सांगितले की, आई होणे खरोखरच आनंददायक असून, तो छोटासा मुलगा पूर्णत: तुमच्यावर अवलंबून असतो. त्यामुळे त्याच्यासोबत व्यतीत केलेला प्रत्येक क्षण अनमोल असतो. यावेळी स्टेफनीने तिच्या आगामी ‘आॅॅटोबायोग्राफी’विषयही काही खुलासे केले. तिने म्हटले की, यामध्ये माझ्या मनोरंजन जगतातील प्रवासाचा उल्लेख करण्यात आला आहे. आॅटोबायोग्राफीमध्ये असलेला प्रत्येक क्षण हा खरा असून, माझ्या फॅन्सना तो भावेल याची मला खात्री असल्याचेही स्टेफनीने सांगितले.