...या स्टारला स्वत:चा चेहरा आरशात बघितल्यास होते उल्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 22:05 IST
माणसाचा स्वभाव बघावयाचा असेल तर त्याला आरशासमोर उभे करावे, असे म्हटले जाते. मात्र हॉलिवूडचा एकेकाळचा हिट अॅण्ड हॉट अभिनेता ...
...या स्टारला स्वत:चा चेहरा आरशात बघितल्यास होते उल्टी
माणसाचा स्वभाव बघावयाचा असेल तर त्याला आरशासमोर उभे करावे, असे म्हटले जाते. मात्र हॉलिवूडचा एकेकाळचा हिट अॅण्ड हॉट अभिनेता मात्र आरशासमोर जायला अजिबात धजावत नाही. कारण त्याला त्याचा चेहरा बघून उल्टी होत असल्याचे तो सांगतो. आता तुम्ही विचार करत असाल की, हॉलिवूडसारख्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारा अभिनेता स्वत:च्या चेहºयाचा एवढा तिरस्कार का करीत असावा?, त्याला त्याच्या चेहºयाची एवढी कीळस का येत असावी? विशेष म्हणजे हा अभिनेता जगभरात प्रसिद्ध आहे. जगातल्या कानाकोपºयात त्याचे फॅन्स आहेत. आजही त्याचे चित्रपट आवडीने बघितले जातात. होय, हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून हॉलिवूड स्टार अर्नोल्ड श्वार्जनेगर आहे. लगातार सात वर्षे ‘मिस्टर ओलंपिया’ हा किताब जिंकणाºया अर्नोल्डने डेली मेलला सांगितले की, मी जेव्हा आरशासमोर जातो तेव्हा माझा चेहरा बघून मला उल्टी येते. पुढे बोलताना त्याने त्याच्या बॉडीविषयी नेहमीसारखीच नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. तो म्हणाला की, मला माझी बॉडी तेव्हाही पसंत नव्हती अन् आजही नाही. एवढेच नाही तर त्याला याचेही आश्चर्य वाटते की, असा चेहरा असतानाही लगातार सात वर्षे ‘मिस्टर ओलंपियाचा’ किताब कसा पटकाविला. अर्नोल्डने सांगितल्यानुसार तो स्वत:ला कधीच परफेक्ट समजत नाही. त्याला स्वत:मध्ये कुठल्या-कुठल्या गोष्टींचा अभाव वाटतो. अर्नोल्डने टर्मिनेटरसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारलेली आहे. आपल्या जबरदस्त बॉडीमुळेच तो हिट झाला आहे. मात्र अशातही त्याला स्वत:मध्ये आत्मविश्वासाची कमतरता वाटते. त्यामुळेच कदाचित त्याला त्याच्या चेहºयाची घृणा वाटत असावी. वयाच्या १५व्या वर्षी अर्नोल्डने वजन उचलण्याची ट्रेनिंग घेतली आहे. वयाच्या २०व्या वर्षी त्याला ‘मिस्टर युनिवर्स’ हा किताब मिळाला आहे. बॉडीमुळेच त्याला हॉलिवूडपटांमध्ये संधी मिळाली आहे. एक यशस्वी बॉडी बिल्डरबरोबरच तो एक यशस्वी स्टारदेखील आहे.