स्मिथला ‘कोलॅटरल ब्यूटी’ चित्रपटाचा वाटतो अभिमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 22:39 IST
हॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांच्या यादीत नाव असलेला अभिनेता विल स्मिथ याने सध्या त्याच्या चित्रपटांकडे लक्ष केंद्रित केले आहे. कौटुंबिक वादामुळे ...
स्मिथला ‘कोलॅटरल ब्यूटी’ चित्रपटाचा वाटतो अभिमान
हॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांच्या यादीत नाव असलेला अभिनेता विल स्मिथ याने सध्या त्याच्या चित्रपटांकडे लक्ष केंद्रित केले आहे. कौटुंबिक वादामुळे काही काळ चर्चेत राहणाºया विल स्मिथने आता त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आला आहे. त्याच्या मते, केवळ चित्रपट बनविणे हे एकमेव माझे ध्येय नसून, माझ्या कामातून इतरांना दिलासा मिळायला हवा. विल स्मिथ याच्या आगामी ‘कोलॅटरल ब्यूटी’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त बोलताना तो म्हणाला की, चित्रपटांची निर्मिती करून करिअरला वळण देणे हे माझे ध्येय नाही तर, माझ्या चित्रपटांमुळे इतरांच्या जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी दिशा मिळावी, हा माझा प्रयत्न असेल. यावेळी स्मिथने त्याच्या कोलॅटरल ब्यूटी या चित्रपटात काम केल्याचा अभिमान वाटत असल्याचेही म्हटले. डेविड फ्रॅँकल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट येत्या शुक्रवारी भारतात रिलीज होणार आहे. चित्रपटात केट विंसलेट, एडवर्ड नॉर्टन, कीयरा नाइटली आणि हेलेन मिरेन यांनी भूमिका साकारली आहे. स्मिथच्या मते, या चित्रपटातून वास्तविक भावना दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या आजूबाजूच्या लोकांपासून, समाजापासून आणि आपल्या दुनियेत रमणाºया व्यक्तीची यात भूमिका दाखविण्यात आली आहे. अशाप्रकारचा भूमिका साकारणे आव्हानात्मक असल्याचे त्याने सांगितले.