Join us

सियाने पतीपासून घेतला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 21:37 IST

हॉलिवूडमध्ये अफेयर आणि घटस्फोट ही बाब काही नवी नाही. मात्र २०१६ हे साल या दोन गोष्टींमुळे प्रचंड गाजले त्यातही ...

हॉलिवूडमध्ये अफेयर आणि घटस्फोट ही बाब काही नवी नाही. मात्र २०१६ हे साल या दोन गोष्टींमुळे प्रचंड गाजले त्यातही घटस्फोटांचे प्रकरणे लक्षणीय ठरल्याने हॉलिवूड सेलिब्रिटींच्या स्मरणात हे साल कायम राहील असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आता या घटस्फोटाच्या लांबलचक यादीत गायिका सिया आणि एरिक एंडर्स या जोडप्याचादेखील समावेश झाला आहे. ईआॅनलाइन डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार सिया तिचा पती एरिक एंडर्स याच्यापासून विभक्त झाली आहे. दोन वर्षांचा संसार केल्यानंतर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे दोघांनीही याबाबतचे वक्तव्य करून आम्ही एकमेकांपासून विभक्त झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या संयुक्त वक्तव्यात म्हटले की, खूप विचार केल्यानंतर आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आमच्यातील मैत्री कायम राहणार आहे. मध्यंतरीच्या काळात काही परिस्थिती उद्भवल्यामुळेच आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. दोघांच्या सहमतीने हा निर्णय घेतल्याने भविष्यात आमच्यात कटू संबंध राहणार नाहीत, याची अपेक्षा करीत असल्याचे त्यांनी म्हटले.नेहमीच आपले नाते माध्यमांपासून लपवून ठेवण्यात यशस्वी झालेले हे जोडपे काही दिवसांपूर्वीच रेड कार्पेटवर बघावयास मिळाले होते. फेब्रुवारी २०१६ मध्ये झालेल्या प्री-ग्रॅमी पार्टीत तर दोघांनी एकमेकांचा हात हातात घेऊन हजेरी लावली होती. न्यू यॉर्क येथे साखरपुडा उरकल्यानंतर पुढच्या दोनच महिन्यांत दोघेही विवाहबंधनात अडकले होते. मात्र आता या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.