१८ नोव्हेंबरला रिलिज होणार ‘शट इन’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 16:13 IST
नाओमी वाट्स आणि याकुब ट्रेम्ब्ले यांचा आगामी हॉरर थ्रिलर ‘शट इन’ हा चित्रपट भारतात १८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार ...
१८ नोव्हेंबरला रिलिज होणार ‘शट इन’
नाओमी वाट्स आणि याकुब ट्रेम्ब्ले यांचा आगामी हॉरर थ्रिलर ‘शट इन’ हा चित्रपट भारतात १८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अमेरिकेत प्रदर्शनानंतर एका आठवड्यानंतर भारतात हा चित्रपट प्रदर्शित होईल. भारतात पीव्हीआर पिक्चर्स यांच्यावतीने हा चित्रपट रिलिज केला जाणार आहे. फॉरेन ब्लॅकबर्न यांनी दिग्दर्शित केलेला शट इन हा चित्रपट विधवा बाल मनोवैज्ञानिकच्या जीवनावर आधारित आहे. ही विधना नवीन इग्लंडच्या ग्रामीण भागात वास्तव्य करीत असते. एका भयानक वादळात ती एका मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्रपटात दाखविण्यात आले आहे. वाट्स यांना ‘२१ ग्राम्स’, ‘द इम्पॉसिबल’, ‘किंग कॉँग’ आणि ‘एडारे’ यासारख्या चित्रपटासाठी ओळखले जाते. तसेच अॅक्शन दिग्दर्शक म्हणूनही त्यांची ओळख आहे. शट इन या चित्रपटातून अॅक्शनची झलक बघावयास मिळण्याची शक्यता आहे. या चित्रपटाकडून वाट्स यांना भरपूर अShut-inपेक्षा असल्याच्या त्याच्या प्रवक्त्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.