Join us

Shocking : प्रियंका चोपडाने एक्स बॉयफ्रेण्डविषयी केला ‘हा’ खळबळजनक खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2017 16:25 IST

बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही आपल्या सौंदर्य व अभिनयाचा डंका वाजविणाºया अभिनेत्री प्रियंका चोपडा हिने एक खळबळजनक खुलासा केला आहे. देसी गर्ल ...

बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही आपल्या सौंदर्य व अभिनयाचा डंका वाजविणाºया अभिनेत्री प्रियंका चोपडा हिने एक खळबळजनक खुलासा केला आहे. देसी गर्ल प्रियंकाने चक्क तिच्या पहिल्या प्रेमाची कबुली दिल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. ‘डर्टी लॉन्ड्री’ या प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही शोमध्ये प्रियंका सहभागी झाली होती. शोदरम्यान तिने तिच्या एक्स बॉयफ्रेण्डविषयी खुलासा केला. प्रियंकाने म्हटले की, माझ्याजवळ एक जॅकेट आहे जे मला प्रचंड आवडते. आता तुम्ही विचार करीत असाल की यात खुलासा काय आहे? परंतु प्रियंकाने जे पुढे सांगितले ते वाचून तुम्हालाही धक्का बसणार आहे. प्रियंकाने म्हटले की, हे जॅकेट तिच्या एक्स बॉयफ्रेण्डचे असून, नेहमीच ती तिच्या जवळ ठेवत असते. प्रवास करताना तर ती हमखास हे जॅकेट परिधान करीत असून, यामध्ये तिला खूपच रिलॅक्स वाटत असल्याचे तिने सांगितले. जेव्हा प्रियंकाला या जॅकेटविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने हे उत्तर दिले. प्रियंकाने म्हटले की, माझ्या आयुष्याशी संबंधित बºयाच गोष्टी बदलत आहेत, परंतु या जॅकेटवरील माझे प्रेम आजही कायम आहे. तसेच प्रियंकाने हेही स्पष्ट केले की, जेव्हा माझ्या बॉयफ्रेण्डने हे जॅकेट मला परत मागितले होते तेव्हा मी ते देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता. मात्र यावेळी तिने तिच्या बॉयफ्रेण्डविषयीचा खुलासा केला नाही. त्यामुळे हे जॅकेट नेमके कोणाचे अन् प्रियंकाच्या त्या एक्स बॉयफ्रेण्डचे नाव काय? हा प्रश्न मात्र अजूनही कायम आहे. प्रियंकाचा पहिलाच ‘बेवॉच’ हा हॉलिवूडपट नुकताच रिलीज झाला असून, त्यास जगभरातील प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटात ड्वेन जॉनसन आणि जॅक एफ्रॉन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या व्यतिरिक्त ‘क्वांटिको’च्या दुसºया सीझनमध्येही ती सध्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.