Join us

Shocking : मडोनाला वाटतेय ‘व्हाइट हाउस’च उडवून द्यावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 18:32 IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर अमेरिकेत त्यांचा विरोध वाढला आहे. विशेषत: हॉलिवूडकरांकडून मोर्चे, आंदोलनाच्या माध्यमांतून त्यांचा विरोध केला ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर अमेरिकेत त्यांचा विरोध वाढला आहे. विशेषत: हॉलिवूडकरांकडून मोर्चे, आंदोलनाच्या माध्यमांतून त्यांचा विरोध केला जात असून, दरदिवसाला त्यांच्याविरोधात उभे राहणाºयांच्या संख्येत वाढ होत आहे. वॉशिंग्टन येथे काढण्यात आलेल्या ‘महिला मार्च’मध्ये पॉप गायिका मडोना हिनेही अचानकपणे एण्ट्री करून मार्चमधील महिलांना चकीत तर केलेच शिवाय ट्रम्प विरोधात तिने जोरदार भाषणही दिले.व्हाइट हाउसएफे न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, मडोनाने सांगितले की, ८ नोव्हेंबर रोजी जेव्हा ट्रम्प यांना विजयी घोषित करण्यात आले तेव्हा माझ्या मनात ‘व्हाइट हाउस’ला उडवून देण्याचा विचार आला होता. मात्र त्यानंतर मी त्यांचा शांततेच्या मार्गाने त्यांचा विरोध करण्याचा विचार केला. या मार्चच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की, आजपासून आम्ही सर्व लोक एका क्रांतीची आणि विद्रोहाची सुरुवात करीत आहोत. एक महिला या नात्याने मी या अत्याचारी पर्वाचा अस्वीकार करीत असल्याचेही तिने सांगितले. Also Read : केटी पेरी ट्रम्प यांच्या विरोधात उतरणार रस्त्यावरपुढे बोलताना मडोना म्हणाली की, मी खूप रागात आहे. हो, मी चिडलेली असल्याचे म्हणत तिने मनातील सर्व राग गाण्यातून व्यक्त केला. तिच्या ‘कॅपिटल’ या अल्बममधील ‘एक्स्प्रेस योरसेल्फ’ हे गीत सादर करीत त्यावर जबरदस्त डांस केला. तिचा डान्स बघून मार्चमधील सर्व लोक एकत्र झाले. तिला पाठिंबा देत त्यांनीही तिच्या गाण्यावर ताल धरला. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या मार्चमध्ये जवळपास पाच लाख लोकांनी सहभाग घेतला होता. या मार्चमध्ये माजी विदेशमंत्री जॉन केरी हेदेखील सहभागी झाले होते. त्याचबरोबर अभिनेत्री स्कार्लेट जोहान्सन, एशले जड आणि अमेरिका फरेरा, प्रसिद्ध निर्माते मायकल मूर या सेलिब्रिटींसह मानवाधिकार कार्यकर्त्यांनी मडोनाचे समर्थन करीत तिच्यासोबत स्टेज शेअर केले. अमेरिकेच्या कॅपिटोल इमारतीच्यासमोर प्रचंड संख्येने ट्रम्पच्या विरोधासाठी लोक एकवटले होते. अनेकांनी ट्रम्प यांच्यावर आगपाखड करीत राष्ट्राध्यक्ष पदावर बसण्याची लायकी नसल्याचे म्हटले. मार्चमध्ये डोनाल्ड ट्रम्प विरोधात भाषण देताना मडोनामायकल मूर यांनी तर शनिवारी प्रसिद्ध झालेले एक वृत्तपत्र जाहीरपणे फाडत ट्रम्पचा निषेध केला. या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथ घेतानाचा फोटो प्रसिद्ध केला होता. या महिला मार्च व्यतिरिक्त अमेरिकेतील अनेक भागांमध्ये ट्रम्पच्या विरोधात मोर्चे काढले. या मोर्चा तथा आंदोलनांमध्ये जगभरातील लोकांनी सहभाग नोंदविला. काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रम्प यांचे समर्थन केले. त्याचबरोबर अमेरिकी जनतेला पाठिंबाही दर्शविला.