‘पॅसेंजर्स’ चित्रपटातील हैराण करणारे सेट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 14:33 IST
चित्रपट जरी अभिनेता-अभिनेत्रीच्या नावावर प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणत असला तरी त्या सिनेमाला भव्यता आणि वास्तविकतेचे रूप देण्यात सर्वात मोठा ...
‘पॅसेंजर्स’ चित्रपटातील हैराण करणारे सेट्स
चित्रपट जरी अभिनेता-अभिनेत्रीच्या नावावर प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणत असला तरी त्या सिनेमाला भव्यता आणि वास्तविकतेचे रूप देण्यात सर्वात मोठा हात असतो तो त्यामध्ये वापरण्यात येणाºया सेट्सचा. सेट डिझाईनिंग हा चित्रपटातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. परंतु त्याबद्दल फार कमी वेळा बोलले जाते.हे सांगण्याचे निमित्त म्हणजे ‘पॅसेंजर्स’ हा जेनिफर लॉरेन्स आणि क्रिस प्रॅट अभिनित सिनेमा. या दोन ग्रेट कलाकारांबरोबरच या चित्रपटातील सेट्सदेखील सिनेमाचे प्रमुख आकर्षण आहे. भव्यदिव्य सेट्सची उभारणी यासाठी करण्यात आली आहे. १२० वर्षे कालावधीचा दीर्घकाळ अंतराळ प्रवास क रण्यासाठी लागणाºया अंतराळ यानाचा सेट तर कमालच आहे.चित्रपट पाहिल्यावर लक्षात येते की, हे सेट बनविण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली असेल. अत्यंत विशाल आणि गुंतागुंतींचे सेट या चित्रपटात पाहायला मिळतात. यातील सर्वात मोठा सेट म्हणजे सर्व अंतराळ प्रवासी ज्या भागात प्रेरित निष्क्रियतेच्या अवस्थेत झोपेत असतात तो ‘हायबरनेशन बे’चा सेट आहे. सुमारे २२.८ हजार चौ. फुट त्याचे क्षेत्रफळ असून केवळ ९ आठवड्यांतच तो तयार करण्यात आला. तसेच यानाच्या पुढील भागातील वक्र भिंती ‘जिगसॉ पझल’प्रमाणे चार तुकडे जोडून तयार करण्यात यायच्या.तसेच यानातील स्वीट्स तर एकदम पॉश. १.८ हजार चौ. फुटाचा हा स्वीट यानातील सर्वात सुंदर सेट आहे. दोन मजली या स्वीटमध्ये एक बेडरुम, डायनिंग एरिया, लाऊंज एरिया आहे. प्रोडक्शन डिझायनर गाय हेंड्रीक्स डेज् म्हणाले की, आकारमानाच्यादृष्टीने असे भव्य सेट्स तयार करणे एक मोठे आव्हान होते.तो म्हणतो, ‘आतापर्यंत अशी काही गोष्ट आपण कधी पाहिलेली नसल्यामुळे ते पाहण्यात एक वेगळीच मजा असते. आमच्या पाच विभागाच्या संपूर्ण टीमने मिळून हा सेट उभारला असून तो श्वास रोखून ठेवण्यास भाग पाडणारा आहे. मोठ्या पडद्यावर हे सेट्स पाहताना आपण केलेल्या कामाच चीज झाल्याची भावना येते.’ ६ जानेवारीला हा चित्रपट चार भाषांतून भारतात रिलीज झालेला आहे.