‘अवतार’चा सिक्वल पुन्हा एकदा टळला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2017 21:25 IST
दिग्दर्शक जेम्स कॅमरून यांनी स्पष्ट केले की, ‘अवतार’ या सिनेमाचा सिक्वल पुन्हा एकदा टळला आहे. एका मुलाखतीत कॅमरून यांनी ...
‘अवतार’चा सिक्वल पुन्हा एकदा टळला!
दिग्दर्शक जेम्स कॅमरून यांनी स्पष्ट केले की, ‘अवतार’ या सिनेमाचा सिक्वल पुन्हा एकदा टळला आहे. एका मुलाखतीत कॅमरून यांनी म्हटले की, ‘अवतार’ या सिनेमाचा सिक्वल २०१८ पर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहचविला जाईल, अशी चर्चा होती. मात्र आता ही चर्चा फोल ठरणार असून, पुन्हा एकदा सिक्वलच्या निर्मितीत बदल करण्यात आले आहे. पुढे बोलताना कॅमरून म्हणाले की, आम्ही अद्यापपर्यंत सिनेमाच्या रिलीजची घोषणा केलेली नाही. जेव्हा त्यांना सिनेमाच्या निर्मितीत विलंब का होत आहे, याविषयीचे कारण विचारण्यात आले तेव्हा त्यांनी म्हटले की, लोकांना एक गोष्ट समजायला हवी की आम्ही ‘अवतार-२’ बनवित नसून, २, ३, ४ आणि ५ या सर्व भागांची निर्मिती करणार आहोत. त्यामुळे ही बाब म्हणावी तेवढी सोपी नाही. मुळात ही कल्पनाच एखाद्या महाकाय उपक्रमाप्रमाणे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हे थोडे वेगळे असले तरी, आम्ही ते प्रत्यक्षात आणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कॅमरून यांच्या स्टुडिओच्या सहकाºयाने २००९ च्या विज्ञानावर आधारित ‘महाकाव्य यूबी सॉफ्ट’ हा एक नवा व्हिडीओ गेम बनविला आहे. यूबी सॉफ्ट व्हिडीओम गेम बनविणारी एक कंपनी असून, त्यांच्यासोबत आम्ही अवतारची निर्मिती करणार आहोत. अवतार हा जगभरात रोमांचक आणि अद्भुत असेल हे मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो. जेव्हा अवतार रिलीज होणार तेव्हा जगभरात त्याची चर्चा असेल, असा विश्वासही कॅमेरून यांनी व्यक्त केला. दरम्यान ‘अवतार’ एक वेगळी दुनिया दाखविण्यात आली होती. प्रेक्षकांनी त्यास जबरदस्त पसंती दिली होती. त्यावेळी अवतारने कमाईचे अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले होते.