ब्रँजेलिनाचे ‘न्यू ओरलिन्स मॅन्शन’ची अखेर विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 17:25 IST
एकेकाळी अतुट वाटणारे हॉलीवूड रॉयल कपल ब्रँजेलिना यांनी त्यांचे न्यू ओरलिन्स शहरातील घर विकेल आहे. घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जाणाऱ्या या ...
ब्रँजेलिनाचे ‘न्यू ओरलिन्स मॅन्शन’ची अखेर विक्री
एकेकाळी अतुट वाटणारे हॉलीवूड रॉयल कपल ब्रँजेलिना यांनी त्यांचे न्यू ओरलिन्स शहरातील घर विकेल आहे. घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जाणाऱ्या या जोडप्याने हे घर ४.९ मिलियन डॉलर्समध्ये (३२ कोटी रु.) विकले.२००७ साली त्यांनी हे घर ३.५ मिलियन डॉलर्समध्ये खरेदी केले होते. ७.५ हजार चौ. फुट जागेवर पसरलेल्या या विशाल घरात पाच बेडरुम, तीन फुल स्केल बाथरुम तर दोन स्मॉल स्के ल बाथरुम आहे.अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांनी विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून त्यांच्या संपत्तीचे कसे वाटे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नुकतेच त्यांनी त्यांचे लग्न ज्या घरात झाले होते ते फ्रान्समधील ‘शॅट्यू’ मिराव्हल’ घरसुद्धा विकायला काढले आहे. घटस्फोट फायनल होण्यापूर्वीच हे ‘मि. अँड मिसेस स्मिथ’ कपल त्यांची सर्व संयुक्त मालमत्ता विकणार आहे. सध्या तरी त्यांचे सहा मुले अँजेलिनाकडे राहत असून मुलांच्या कस्टडीबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. आठ वर्षे एकमेकांसोबत राहिल्यावर चार वर्षांपूर्वी दोघांनी लग्न केले होते.