Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेलेनाला नाही शिफारशीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 20:21 IST

गायिका सेलेना गोमेज हिला अमेरिकी म्युझिक अवॉर्ड (एएमए)मध्ये फेव्हरेट पॉप/रॉक सिंगर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासोहळ्याप्रसंगी ‘सेलेनाने ...

गायिका सेलेना गोमेज हिला अमेरिकी म्युझिक अवॉर्ड (एएमए)मध्ये फेव्हरेट पॉप/रॉक सिंगर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासोहळ्याप्रसंगी ‘सेलेनाने मला कोण्याच्या शिफारशीची गरज नसल्याचे म्हटले आहे.एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार सेलेनाने भाषणामध्ये म्हटले की, २०१४ मध्ये मी या स्टेजवर तुमच्यासोबत खरोखरच शंभर टक्के प्रामाणिक होते. मात्र काहींनी याचा उलट अर्थ घेतला, अशा लोकांना मी सांगू इच्छिते की मी मिळवलेले यश हे स्वबळावर आहे. मला कोणाच्या शिफारशीची गरज नाही. पुढे बोलताना सेलेनाने म्हटले की, मला असे वाटते की तुम्ही माझ्याविषयी बरेचसे जाणून आहात, काही मला आवडत नसलेल्या बाबीही तुम्हाला ज्ञात आहेत. परंतु मी याचा कधी विचार केला नाही. मधल्या काळात मी खूप निराश झाले होते. मला काहीच सुचत नव्हते. परंतु मी पुन्हा या क्षेत्रात आत्मविश्वासाने उभी आहे. मी तुम्हाला वचन देते की, मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही. मी माझ्या गायनातून स्वत:ला सिद्ध करणार आहे. कृपया माझ्या बोलण्याचा चुकीचा विचार करू नये. हे मी प्रसिद्धीसाठी बोलत नाही. कारण मला प्रसिद्धीची गरजच नाही, असे रोखठोक भाषण तिने याप्रसंगी दिले. सेलेना गोमेज ही एक गुणी गायिका असून, तिने आतापर्यंत एकापेक्षा एक हिट गाणे गायली आहेत. मधल्या काळात ती गाण्यांपासून दूर होती, त्यामुळे चाहत्यांकडून वेगवेगळे अर्थ लावले जात होते. मात्र ती परतल्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तिच्याकडून हिट गाण्यांची चाहत्यांना अपेक्षा आहे.