Join us

होरानला सतावतात सेलेनाच्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2016 19:55 IST

एकेकाळचे लव्ह बर्ड म्हणून ओळखले जाणारे नियाल होरान आणि सेलेना गोमेज यांच्यात ब्रेकअप झाले असले तरी, होरानला सेलेनाच्या आठवणी ...

एकेकाळचे लव्ह बर्ड म्हणून ओळखले जाणारे नियाल होरान आणि सेलेना गोमेज यांच्यात ब्रेकअप झाले असले तरी, होरानला सेलेनाच्या आठवणी सतावत आहेत. इंग्रजी-आयरिश पॉप ब्रॅँड वन डायरेक्शनचा सदस्य असलेल्या नियाल होरान याने याची कबुली दिली असून, त्याची सेलेनासोबत पुन्हा रोमांस करण्याची इच्छा आहे. ईआॅनलाइन डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार होरान आणि सेलेना २०१५ या सालात एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र, काही काळानंतर त्यांच्यात ब्रेकअप झाले. परंतु होरानने सेलेनासोबत घालविलेल्या त्या सुंदर क्षणाच्या आठवणी तो अजूनही विसरलेला नाही. तो पुन्हा सेलेनाच्या प्रेमात पडू इच्छितो. त्याने यावर नुकतीच  प्रतिक्रिया दिली असून, त्यामध्ये मी आणि सेलेना आजही सिंगलच आहोत असे म्हटले आहे. आॅन एअर विद रयान सीकरेस्ट या रेडिओ शोमध्ये जेव्हा होरान ‘तू कोणाला डेट करू इच्छितो’ असे विचारण्यात आले तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न करता सेलेनाचे नाव घेतले. सध्या माझी एकही गर्लफ्रेंड नाही. सेलेनाला मी अजूनही विसरलेलो नाही. पुन्हा तिच्या प्रेमात पडण्याची माझी इच्छा आहे. संधी मिळाल्यास मी सेलेनालाच डेट करेल असे मोकळेपणाने सांगितले. होरान ऐवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने रयान सीकरेस्ट यालाच तू आम्हाला पुन्हा एकत्र आणण्यासाठी काही तरी मदत कर असे सांगितले. तसेच त्याने वन डायरेक्शनमध्ये पुन्हा एकदा परतणार असून, माझ्यात कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही, असेही तो म्हणाला.