प्रेग्नेंट बियॉन्सेचा परफॉर्मन्स ठरला डोळे दीपविणारा, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2017 20:03 IST
‘द शो मस्ट गो आॅन’ ही इंग्रजी भाषेतील म्हण टॉप सिंगर बियॉन्से हिच्याबाबतीत अगदी तंतोतंत खरी ठरतेय. कारण स्टेजवर तिला परफॉर्मन्स करण्यास कोणीच रोखू शकत नाही.
प्रेग्नेंट बियॉन्सेचा परफॉर्मन्स ठरला डोळे दीपविणारा, पहा फोटो
‘द शो मस्ट गो आॅन’ ही इंग्रजी भाषेतील म्हण टॉप सिंगर बियॉन्से हिच्याबाबतीत अगदी तंतोतंत खरी ठरतेय. कारण स्टेजवर तिला परफॉर्मन्स करण्यास कोणीच रोखू शकत नाही. सध्या ती प्रेग्नेंट असून, लवकरच जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. मात्र अशा अवस्थेतही तिच्यातील उत्साह आणि ऊर्जा बघण्यासारखी आहे. गेल्या रविवारी ग्रॅमी अॅवॉर्ड्समध्ये याचा प्रत्यय आला असून, बियॉन्सेने केलेला परफॉर्मन्स डोळे दीपवणारा ठरला. कारण तिने आपल्या बेबी बंपसह केवळ गाणंच गायिलं नाही तर, त्यावर ठुमकेही लावले. बियॉन्सेचा हा उत्साह प्रेरणादायी असल्याचाच सूर यावेळी व्यक्त केला गेला. यावेळी बियॉन्सेने ‘मदरहुड’ या विषयावर जोरदार भाषणही दिले. तिच्या परफॉर्मन्सच्या वेळी सबंध हॉल तिला जणूकाही डोळे भरून बघत होता. प्रेग्नेंसीमुळे तिला फारसा डान्स करता आला नसला तरी, तिने एक गोष्ट मात्र सिद्ध केली ती म्हणजे तिच्यातील वर्सेटाइल टॅलेंटने ती कोणालाही बांधून ठेवू शकते. यावेळी बियॉन्सेने गोल्डन ड्रेसवर एक सोनेरी मुकुट परिधान केला होता. तिची मुलगी ब्लू आयवी आणि पती जे जेड हेही प्रेक्षकांमध्ये बसून, तिला चीअर अप करीत होते. या महिन्याच्याच १ तारखेला तिने प्रेग्नेंट असल्याचा खुलासा केला होता. त्याचबरोबर जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याचेही तिने सांगितले होते. तसेच बेबी बंप दाखविणारे काही फोटोही तिने शेअर करून खळबळ उडवून दिली होती. दरम्यान ग्रॅमी अॅवॉर्डमध्ये तिला ‘बेस्ट अर्बन कंटेंपरेरी अल्बम’साठी अॅवॉर्ड देण्यात आला. यासाठी बियॉन्सेने पती आणि मुलीचे आभार मानले. बियॉन्सेला ग्रॅमी अॅवॉर्डमध्ये तब्बल नऊ कॅटेगरीसाठी नामांकन मिळाले होते.