Join us  

SEE PICS : ब्रॅड पिटशिवाय असा साजरा केला अँजेलिना जोली व मुलांनी न्यू इयर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2017 3:04 PM

अँजेलिना जोलीने नव्या वर्षाचे स्वागत आनंदात आणि मुलांसोबत मस्तपैकी सुटी एन्जॉय करत केले. तिच्या आनंदाचे एक कारण म्हणजे यावेळी ...

अँजेलिना जोलीने नव्या वर्षाचे स्वागत आनंदात आणि मुलांसोबत मस्तपैकी सुटी एन्जॉय करत केले. तिच्या आनंदाचे एक कारण म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत ब्रॅड पिट नव्हता. दरवर्षी एकत्र न्यू इयर साजरा करणारे ब्रँजेलिना यंदा मात्र सोबत नव्हते.मुलांना घेऊन अँजेलिना कोलोराडोला गेली होती. ब्रॅडपासून वेगळे झाल्यानंतर पहिल्यांदाच तिला एवढे आनंदी आणि खुश पाहण्यात आले. सहा मुलांची आई असणाऱ्या अँजेलिनाने जहारा, विवियन आणि नॉक्स यांच्यासोबत बर्फावर स्कीर्इंगचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी त्यांच्यासोबत एक प्रशिक्षक आणि बॉडीगार्ड होता.शिल्हो आणि नॉक्स या दोन मुलांसोबत मग ती शहरात फे रफटका मारायला गेली. यावेळी त्यांनी ‘रॉकी माउंटेन चॉकोलेट फॅक्टरी’ येथे एवढ्या कडाक्याच्या थंडीत आईस्क्रीमचा आस्वाद घेतला. अँजेलिना यावेळी काळ्या रंगाचे जाड स्की जॅकेट आणि केसाळ लाइनिंगचे हुड परिधान केलेले होते. गरमागरम ड्रिंकचे घोट घेत तिने मुलांना कॅरेमल अ‍ॅपलीची ट्रीट दिली.                                                                                                   फॅमिली टाईम : अँजेलिना जोली व तिची मुलगी विवियनमुलांसाठी तिने शहरतील दुकानांतून विविध खेळणीसुद्धा खरेदी केली. उपस्थित सुत्रांनी माहिती दिली की, आई व मुलांना खूप धमाल केली. सगळेच एकदम खूश आनंदी दिसत होते. घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर प्रथमच पिट-जोली फॅमिली मजेत वेळ घालवताना दिसली. अँजेलिनासाठी नव्या वर्षात नव्या दमाने सुरुवात करण्यासाठी अशा प्रकारच्या सुटीची गरज होती. तिकडे ब्रॅड पिटसाठी ख्रिसमस आणि न्यू इयर अत्यंत वाईट ठरल्याचे सांगण्यात येतेय.सुत्रांच्या माहितीनुसार, घटस्फोटाच्या तणावामुळे अँजेलिना सातत्याने धूम्रपान करीत आहे. याचा परिणाम तिच्या आरोग्यावरही स्पष्टपणे दिसून येऊ लागला. दिवसभर ती केवळ धूम्रपान करीत असून, दिवसभरात किमान दोन सिगारेटचे पॅकेट ती संपविते.                                                                                                    आइस्क्रीम ट्रीट : अँजेलिना जोली व तिचा मुलगा नॉक्स​सप्टेंबर महिन्यात ब्रँजेलिना कपलने वेगळे होत असल्याचे घोषित केले होते. तेव्हापासून आजतागायत हे प्रकरण मीडियामध्ये चर्चेत आहे. मुलांना अधिक वेळा भेटण्याची ब्रॅडला परवानगी कोर्टाने नाकारल्यानंतर हे प्रकरण अधिकच चिघळले. त्याने विमानात दारूच्या नशेत मोठा मुलगा मॅक्सला मारहाण केल्याचेही वृत्त होते.विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून त्यांच्या संपत्तीचे कसे वाटे होणार याकडेदेखील सर्वांचे लक्ष लागले होते. नुकतेच त्यांनी त्यांचे लग्न ज्या घरात झाले होते ते फ्रान्समधील ‘शॅट्यू मिराव्हल’ हे  घर विकायला काढले. तसेच ‘न्यू ओरलिन्स मॅन्शन’सुद्धा विकले.