Join us

SEE PIC : ‘‘बेवॉच’च्या प्रीमियरमध्येही देसी गर्ल प्रियंका चोपडाचाच डंका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2017 21:07 IST

बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियंका चोपडा हिच्या ‘बेवॉच’ या हॉलिवूडपटाच्या रिलीजसाठी केवळ १२ दिवस शिल्लक राहिले असून, अमेरिकन फॅन्सचा ...

बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियंका चोपडा हिच्या ‘बेवॉच’ या हॉलिवूडपटाच्या रिलीजसाठी केवळ १२ दिवस शिल्लक राहिले असून, अमेरिकन फॅन्सचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. लोकांमध्ये अशाप्रकारचा उत्साह असणे स्वाभाविक आहे, कारण चित्रपटात ड्वेन जॉन्सन (रॉक), जेक एफ्रॉन, एलेक्जेंड्रा, पामेला एंडरसन यांसारखी तगडी स्टारकास्ट असून, त्यांच्याबरोबर आता प्रियंकाचेही नाव जोडले गेले आहे. या चित्रपटाचा नुकताच प्रीमियर सोहळा पार पडला असून, त्यामध्ये प्रियंकासह इतर स्टारकास्टचा अंदाज बघण्यासारखा होता. प्रियंका या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये डेब्यू करीत आहे. या प्रीमियर सोहळ्यात आलेल्या सेलिब्रेटींमधील उत्साह पाहता चित्रपट प्रेक्षकांवर जादू करेल, यात शंका नाही. या प्रीमियरसाठी चित्रपटातील संपूर्ण कास्ट उपस्थित होती. मात्र यामध्ये आपली देसी गर्लचा जलवा काही औरच होता. वास्तविक जेव्हा प्रियंकाला फॅशनची संधी मिळते, तेव्हा ती तिच्या चाहत्यांना कधीच नाराज करत नाही. प्रियंका या प्रीमियरमध्ये निळ्या रंगाचा स्टायलिश ड्रेस परिधान करून पोहोचली होती. या ड्रेसमध्ये प्रियंका खूपच हॉट दिसत होती. विशेष म्हणजे प्रियंकाचा हा लूक बघता इतर अभिनेत्री तिच्यासमोर पाणी भरताना दिसत होत्या. प्रियंकाच्या ग्लॅमर अवतारापुढे कोणीही फारसे आकर्षक दिसत नव्हते. एक दिवस अगोदरच चित्रपटाच्या संपूर्ण कास्टने मीडियाला मुलाखती देऊन चित्रपटाचे प्रमोशन केले. त्यातच प्रियंकाचे मिआमी बिचवरील बिकिनी फोटोज् याचदरम्यान व्हायरल होत असल्याने, मीडियामध्येही त्यावेळी प्रियंकाच चर्चेचा विषय ठरली. दोन दिवसांपूर्वीच प्रियंका मिआमीच्या बीचवर मस्तीच्या मूडमध्ये बघावयास मिळाली होती. बीचवरील प्रियंकाचा अंदाज खूपच कातिलाना असल्याने सध्या ती जबरदस्त चर्चेत आहे.  हा चित्रपट भारतात २ जून रोजी रिलीज होणार आहे. या प्रीमीयरचे काही फोटोज सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून, त्यामध्ये केवळ पीसीचे सर्वत्र कौतुक केले जात आहेत. दरम्यान भारतामध्येदेखील या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता असून, प्रत्येकजण या चित्रपटाविषयी आतुर आहेत. आता हा चित्रपट भारतात कितपत यशस्वी ठरेल हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.