Join us

SEE HOT PIC : प्रियांका चोपडाचा पहा कातिलाना ‘बेवॉच’ लूक; अशी सेक्सी खलनायिका कदाचित तुम्ही बघितली नसेल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2017 21:45 IST

​बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोपडा हिच्या ‘बेवॉच’ या डेब्यू हॉलिवूडपटाचे दुसरे ट्रेलर आज रिलीज करण्यात आले असून, यामध्ये प्रियांकाचा अंदाज बघण्यासारखा आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोपडा हिच्या ‘बेवॉच’ या डेब्यू हॉलिवूडपटाचे दुसरे ट्रेलर आज रिलीज करण्यात आले असून, यामध्ये प्रियांकाचा अंदाज बघण्यासारखा आहे. खरं तर पीसीने हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताच तिचे रूप खुलले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यामुळेच चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारूनही पीसीचा कातिलाना अंदाज सगळ्यांनाच प्रेमात पाडणारा आहे. पहिल्या ट्रेलरमध्ये पीसीची फारशी झलक बघावयास मिळाली नव्हती; मात्र दुसºया ट्रेलरमध्ये तिला दिलेले स्थान हे तिच्या फॅन्सना सुखावणारे असून, तिच्या कातिलाना अदा घायाळ करणाºया आहेत. या ट्रेलरमध्ये प्रियांका केवळ दिसलीच नाही तर तिच्या तोंडून बरेसचे डायलॉगदेखील ऐकावयास मिळाले आहेत.याच ट्रेलरमधील तिचे अतिशय हॉट अ‍ॅण्ड बोल्ड असे १० फोटोज् आज आम्ही दाखविणार आहोत. जे बघून तुम्ही अवाक् व्हाल. कारण आतापर्यंत तुम्ही एवढी हॉट अ‍ॅण्ड सेक्सी खलनायिका कधी बघितली नसेल, असे म्हटले तर वावगे ठरू नये. दुसºया ट्रेलरमध्ये प्रियांकाची ड्रेसिंग स्टाइल, अदा आणि डायलॉग डिलिव्हरीने प्रेक्षकांवर चांगलीच छाप सोडली आहे. ‘बेवॉच’ या चित्रपटातून प्रियांका हॉलिवूडमध्ये डेब्यू करीत असून, यामध्ये ती खलनायिकेच्या भूमिकेत असेल. चित्रपटात तिच्यासोबत ‘ड्वेन जॉन्सन आणि जॅक एफ्रोन प्रमुख भूमिकेत आहेत. रॉक ऊर्फ ड्वेन जॉन्सनने ‘बेवॉच’चे दुसरे ट्रेलर शेअर केले आहे. पहिल्या ट्रेलरमध्ये प्रियांकाच्या भूमिकेविषयी अधिक सस्पेन्स ठेवण्यासाठी तिला अधिक दाखविण्यात आले नसावे असे आता जाणकारांकडून बोलले जात आहे. कारण दुसºया ट्रेलरमध्ये प्रियांकाच्या अदांमुळे चित्रपटाबाबत अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट एक सस्पेन्स आणि थ्रिल ड्रामा आहे. जर तुम्ही अद्यापपर्यंत ‘बेवॉच’चे दुसरे ट्रेलर बघितले नसेल तर व्हिडीओवर क्लिक करा.