Join us

SEE HOT PIC : ‘ग्लॅमर’साठी प्रियांका चोपडाने केले बोल्ड फोटोशूट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2017 17:41 IST

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या ग्लॅमरचा जलवा दाखविणारी अभिनेत्री प्रियांका चोपडा आता ‘ग्लॅमर’ मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकणार आहे. याकरिता प्रियंकाने खास ...

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या ग्लॅमरचा जलवा दाखविणारी अभिनेत्री प्रियांका चोपडा आता ‘ग्लॅमर’ मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकणार आहे. याकरिता प्रियंकाने खास फोटोशूट केले असून, त्यामध्ये ती खूपच हॉट अ‍ॅण्ड सेक्सी अवतारात दिसत आहे. नुकतेच प्रियांकाने मेट गाला २०१७ मध्ये ट्रेंच कोट परिधान करून सगळ्यांना अवाक् केले होते. तिची एंट्री होताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. प्रियांकाच्या या कोटने एक आगळेवेगळे रेकॉर्ड केले असून, एवढा मोठा कोट परिधान करणारी ती पहिलीच सेलिब्रिटी ठरली आहे. दरम्यान, प्रियांकाने ‘ग्लॅमर’ केलेल्या या फोटोशूटमध्ये ती खूपच उठून दिसत आहे. प्रियंकाचा लूक खूपच हॉट दिसत असल्याने सोशल मीडियावर हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. प्रियांकाने तिच्या अपकमिंग ‘बेवॉच’ या चित्रपटाच्या प्रमोटवेळी हे फोटोशूट केले आहे. हा चित्रपट भारतात २६ मे रोजी रिलीज होणार आहे. दरम्यान प्रियांका नुकतीच भारतात आली होती. दहा दिवसांच्या तिच्या भारत दौऱ्यावर तिने दोन बॉलिवूड प्रोजेक्टविषयी चर्चा केल्याचे बोलले जात आहे. शिवाय तिने यावेळी तिच्या आगामी ‘बेवॉच’ या चित्रपटाचे प्रमोशनही केले होते.