Join us

कर्टनीची समजूत काढण्यात स्कॉट अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2016 18:42 IST

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार कर्टनी कर्दशियांचे सध्या तिचा बॉयफ्रेंड स्कॉट डिसिक याच्याशी चांगलेच बिनसले आहे. कर्टनीने तर यापूर्वीच स्कॉटसोबत संबंध ...

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार कर्टनी कर्दशियांचे सध्या तिचा बॉयफ्रेंड स्कॉट डिसिक याच्याशी चांगलेच बिनसले आहे. कर्टनीने तर यापूर्वीच स्कॉटसोबत संबंध तोडण्याचा जाहीर केले. परंतु स्कॉट कर्टनीपासून दूर जावू इच्छित नाही. तो तिला समजविण्याचा साातत्याने प्रयत्न करीत आहे. परंतु त्याला अद्यापपर्यंत कर्टनीची समजूत काढण्यात यश आले नसल्याचे समजते. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुुसार, स्कॉटला आशा आहे की, कर्टनीने परत त्याच्याकडे यावे. त्यासाठी तो संधी मिळेल तेव्हा कर्टनीला समजविण्याचा प्रयत्न करीत असतो, मात्र कर्टनीने जणू काही डिसिकसोबत संबंध न ठेवण्याचा पक्का निर्णय केल्याने तो सातत्याने अपयशी ठरत आहे. त्यामुळे कर्टनी पुन्हा स्कॉटकडे येईल याची शक्यता आता धुसर दिसत आहे. यूएसमॅगजीन डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, कर्टनीने स्कॉटसोबतचे नाते पूर्र्णत: तोडले असून, ती आता अन्य एका सेलिब्रिटीसोबत डेटिंग करीत आहे. स्कॉट फ्रांसमध्ये त्याची पहिली गर्लफ्रेंड कोल बातोर्ली हिच्यासोबत फिरताना बघावयास मिळाला होता. तेव्हापासूनच कर्टनी आणि स्कॉटच्या संबंधांमध्ये दुफळी निर्माण झाली होती. जुलै २०१५ मध्ये तर कर्टनीने स्कॉटशी असलेले नाते तोडणार असल्याचे जाहीरही केले होते. मात्र स्कॉट अजूनही कर्टनीपासून दूर जाण्यास तयार नाही. तो सातत्याने कुठल्या ना कुठल्या मार्गाने तिच्याशी संपर्क साधून समजूत काढण्याचा प्रयत्न करीत असतो. दरम्यान कर्टनी सध्या एका सेलिब्रिटीसोबत डेटिंग करीत असून, ती त्याचे नाव जाहीर करण्याच्या तयारीत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने याबाबतचे संकेतही दिले आहे. यामुळे स्कॉटचे टेन्शन वाढले नसेल तरच नवल.