Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्कॉट, कर्टनीमध्ये आलबेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 18:40 IST

रिअ‍ॅलिटी टी. व्ही. स्टार कर्टनी कर्दाशियांचे तिच्या एक्स पार्टनर स्कॉट डिसिक यांच्यात बिनसल्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगत होत्या. ...

रिअ‍ॅलिटी टी. व्ही. स्टार कर्टनी कर्दाशियांचे तिच्या एक्स पार्टनर स्कॉट डिसिक यांच्यात बिनसल्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगत होत्या. स्कॉट हा कर्टनीला समजविण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करीत होता, मात्र त्यात त्याला यश मिळत नव्हते. मात्र आता या दोघांमध्ये पॅचअप झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सध्या कर्टनी स्कॉटच्या प्रेमात पडली असून, तिच्या तीन मुलांप्रती स्कॉटची वाढलेली जवळीकता तिला भारावून टाकणारी आहे. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार स्कॉट सुरुवातीला कर्टनीला खूप त्रास देत होता. त्यामुळेच तिने त्याच्यापासून दूर जाण्याचा निर्ण घेतला होता. विशेष म्हणजे कर्टनी आज पण दोघांमधील नात्यांबद्दल बोलू इच्छित नाही. तिने अद्यापपर्यंत आमच्यात सर्व काही आलबेल आहे, असे स्पष्टपणे म्हटले नाही. कर्टनीच्या मते, स्कॉट परिवाराप्रती कितपत समर्पित आहे, हे अगोदर मी समजून घेणार आहे. मात्र आता स्कॉटचा जो स्वभाव आहे तो मला पटणारा आहे. सूत्रानुसार, स्कॉट कर्टनीसोबत खूपच प्रेमळ स्वभावाने वागत आहे. यामुळे कर्टनी सध्या त्याच्यावर फिदा झाली आहे. तसेच त्याच्या या बदलेल्या स्वभावामुळे देखील ती खुश आहे. एकेकाळी असे वाटत होते की, दोघेही एकमेकांपासून विभक्त होण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. विशेष म्हणजे कर्टनी दुसºयाला डेट करीत असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्यात सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत आहे. स्कॉट एक पती म्हणून जबाबदारीने वागत असून, मुलांची तो काळजी घेत आहे.