Join us
Daily Top 2Weekly Top 5

फ्रॅँकीने सोडला ‘द सॅटर्डे’ बॅण्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 19:26 IST

गायिका फ्रॅँकी ब्रिज हिने ‘द सॅटर्डे’ या बॅण्डच्या रियुनियनला स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. कारण तिला या बॅण्डचा कंटाळा ...

गायिका फ्रॅँकी ब्रिज हिने ‘द सॅटर्डे’ या बॅण्डच्या रियुनियनला स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. कारण तिला या बॅण्डचा कंटाळा आला आहे. त्यामुळे तिने या बॅण्डला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी फ्रॅँकीने सांगितले की, मला अधिक काळ एकच गोष्ट करायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी या बॅण्डपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याचबरोबर मी स्वत:ला भाग्यशाली समजते की, मला दोन नामांकित बॅण्डसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. फिमेलफर्स्ट डॉट कॉ डॉट यूकेने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिजने ‘फॅबूलस’ साप्ताहिकाला सांगितले की, मी माझ्या करिअरमध्ये कधीही म्युझिकल थिएटर केलेले नाही. त्यामुळे भविष्यात मी याचा नक्की विचार करणार. मात्र तिच्या बॅण्डमेट ऊना हिली हिने फ्रॅँकी पुन्हा बॅण्डशी जुळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ब्रिज आमच्यासोबत असेल, असेही तिने सांगितले. या बॅण्डमध्ये मॉली किंग, रॉचे ह्यूम्स आणि विनसा व्हाइट हे कलाकार आहेत.