हॉलिवूडमध्ये घटस्फोट होणे काही नवीन नाही. त्यातच ब्रँजेलिनाच्या घटस्फोटाची भर पडल्याने यावर नव्याने चर्चा घडू लागली आहे. अभिनेत्री सारा जेसिका पार्कर घटस्फोटाला प्रचंड घाबरत असल्याचे तिने कबूल केले आहे. गेल्या १९ वर्षांपासून मॅथ्यू ब्रॉडरिक यांच्यासोबत सुखाने संसार करीत असलेली सारा सध्या ‘डिवोर्स’ या टिव्ही मालिकेत काम करीत आहे. मालिकेविषयी जेव्हा तिला विचारण्यात आले तेव्हा तिने घटस्फोटाविषयी तिचे मत स्पष्ट केले.
पतीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेणाºया महिलेची भूमिका सारा ‘डिव्होर्स’ या मालिकेत करीत आहे. या पात्राचे नाव फ्रांसिस असे आहे. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार सारा म्हणाली, फ्रांसिस तिच्या वास्तविक जीवनात त्रासलेली असते, त्यामुळेच ती घटस्फोटाचा निर्णय घेते. दूर राहणे आणि घटस्फोट घेणे या दोन्ही गोष्टी भयावह आहेत. मी माझ्या जवळच्या मैत्रिणीला घटस्फोटामुळे येत असलेल्या अडचणी जवळून बघत आहे. तिला या सर्व प्रकारामुळे करिअरवर पाणी सोडावे लागले. अशात ती तिच्या मुलांचा चांगला सांभाळ करू शकेल का? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे. दरम्यान साराची ही मालिका १७ आॅक्टोंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.