Join us

मिला योवोव्हिचला करायचेय सलमाना खानसोबत काम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2017 11:04 IST

बॉलीवूडचा ‘दबंग’ समलमान खान केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रचंड लोकप्रिय आहे. त्याच्यासोबत काम करण्यासाठी फक्त बॉलीवूडमधील सगळ्या अभिनेत्रीच ...

बॉलीवूडचा ‘दबंग’ समलमान खान केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रचंड लोकप्रिय आहे. त्याच्यासोबत काम करण्यासाठी फक्त बॉलीवूडमधील सगळ्या अभिनेत्रीच नाही तर हॉलीवूडमधील नायिकासुद्धा उत्सुक आहेत. म्हणून तर मिला योवोव्हिचसारखी हॉलीवूड स्टार सलमानसोबत काम करण्याची इच्छा बाळगून आहे.आगामी ‘रेसिडेंट ईव्हिल : द फायनल चाप्टर’ या चित्रपटाच्या प्रचारार्थ दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने सल्लूमियासोबत एकत्र चित्रपट करण्याची इच्छा तिने व्यक्त केली. ती म्हणाली की, ‘एकदा मी ज्या हॉटेलमध्ये थांबलेले होते तेथे बाहेर खूप गर्दी जमा झाली. मला वाटले ते सर्व माझे फॅन्स आहेत. म्हणून मी बाहेर आले तर कोणीच माझ्याकडे लक्ष देत नव्हते. मला आश्चर्य वाटले. परंतु तेवढ्यात एक व्यक्ती बाहेर आली आणि सगळे लोक वेडे झाल्यागत ओरडू लगाले. ‘सलमान’ नावाचा जपच सुरू झाला. अशी मॅडनेस मी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. तेव्हा आपसूकच उत्सुकता निर्माण झाली की, ही व्यक्ती कोण आहे.’जेव्हा तिने माहिती काढली तेव्हा तिला कळाले की, लोक ज्याच्यासाठी वेडे झाले तो बॉलीवूडचा सर्वात मोठा सुपरस्टार सलमान खान आहे. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तर काय करशील असे विचारले असता ती म्हणाली की, ‘मी आनंदाने करेन. त्याच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा आहे. आता हे खरं आहे की, हिंदी चित्रपटासाठी लागणारे नाचगाणे मला येत नाही. पण मी ते शिकून घेईन.’म्हणजे ट्रिपल एक्स दिग्दर्शकानंतर आणखी एका हॉलीवूड सेलिब्रेटीला बॉलीवूडचे वेध लागले आहे असे म्हणावे लागेल. मिला योवोव्हिच येत्या ३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘रेसिडेंट ईव्हिल : द फायनल चाप्टर’ सिनेमात दिसणार असून या सिरीजमधील हा शेवटचा चित्रपट असणार आहे.