Join us

रयान रेनाल्ड्सने सांगितले ‘लाइफ’च्या सेटवरील मजेशीर किस्से!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 19:42 IST

‘डेडपूल’ या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर रयान रेनाल्ड्स पुन्हा एकदा ‘लाइफ’ या बहुचर्चित चित्रपटातून नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुळात ...

‘डेडपूल’ या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर रयान रेनाल्ड्स पुन्हा एकदा ‘लाइफ’ या बहुचर्चित चित्रपटातून नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुळात विज्ञानाधिष्ठित चित्रपटांची आवड असलेला रयान हा किती खोळकर अन् आपल्या सहकाºयांप्रती प्रेमळ असल्याचे त्याने सांगितलेल्या अनुभवांवरून समजते. रयानने ‘लाइफ’च्या सेटवरील अनेक गमतीदार किस्से सांगताना जेक जिलएनहॉन आणि रेबेका फर्ग्युसन हिच्याबरोबर जमलेल्या गट्टीचा उलगडा केला. तो म्हणाला की, ‘लाइफ’च्या चित्रिकरणादरम्यान सेटवर कुठलेच गंभीर वातावरण नव्हते. सर्व काही विनोदी वातावरणात घडत गेले. आम्हाला प्रेक्षकांसमोर सर्वोत्कृष्ट निर्मिती पोहचवायची होती. त्यामुळे असे वातावरण असणे गरजेचे होते. कारण प्रफुल्लित वातावरणातच माणूस चांगले काम करीत असतो. त्याच्याकडे असलेल्या सर्व गोष्टी तो कामात ओतत असतो. रयानच्या मते, जेक आणि त्याने हास्यविनोदातच निर्मात्यांचे पैसे वाया घालविले आहेत. अर्थात हे तो विनोदात म्हणतो. असाच एक अनुभव सांगताना रयान म्हणतो की, एकदा आमच्यात असा काही हशा पिकला की, श्वास घेणेही अवघड झाले होते. यावेळी रयान रेबेकाचे कौतुक करतानाही थांबत नाही. त्याच्या मते, रेबेकाची भूमिका खूपच गुंतागुंतीची आहे. कारण चित्रपटात ती एका मध्यवर्ती स्त्री पात्राच्या भूमिकेत असून, तीच चित्रपटाची केंद्रबिंदू आहे. चित्रपटात इतर कलाकारांच्या तुलनेत रेबेकावर सर्वाधिक जबाबदारी आहे. शिवाय तिने ही जबाबदारी खुबीने पार पाडली आहे.  रेबेका खूपच हुशार, भावनाप्रदान आणि सक्रिय अशी अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करणे हा खूप मोठा अनुभव आहे. कारण शूटिंगदरम्यान ती प्रत्येक गोष्ट अगदी सहजतेने करते. त्यामुळेच ती एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असल्याचेही रयानने सांगितले. चित्रपटाविषयी बोलताना रयान म्हणतोय की, ‘लाइफ’ हे एक महाकाव्य आहे. त्यात अंतराळातील आश्चर्यकारक घडामोडी घडतात. चित्रपटातील सर्व गोष्टी अंतराळ घडत असल्याने रोमांच निर्माण करणाºया आहेत. वेगवेगळ्या राष्ट्रातून आलेले सहा अंतराळवीर ‘मंगळ’ ग्रहावर संशोधनासाठी जात असतात. त्यांच्यासोबत एक मानवविरहित उपग्रह असतो. शिवाय नासाने बनविलेले ‘क्यूरोसिटी रोव्हर’ नावाचे यान असते. या यानाभोवती घडणाºया गोष्टी असा काही रोमांच निर्माण करतात की, प्रेक्षकांच्या अंगावर शहारे निर्माण होतील, असेही रयान सांगतो.