Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बेवॉच’च्या प्रमोशनसाठी द रॉकही येणार भारतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 14:03 IST

सध्या हॉलिवूड सुपरस्टार्स भारतात येऊन त्यांच्या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करीत आहेत. नुकताच विन डिझेल त्याच्या ‘एक्सएक्सएक्स : द रिटर्न ...

सध्या हॉलिवूड सुपरस्टार्स भारतात येऊन त्यांच्या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करीत आहेत. नुकताच विन डिझेल त्याच्या ‘एक्सएक्सएक्स : द रिटर्न आॅफ झांडर केज’ या हॉलिवूडपटाच्या प्रमोशनसाठी भारतात आला होता. आता ‘कुंग फू योगा’च्या प्रमोशनसाठी अ‍ॅक्शनस्टार जॅकी चॅन भारतात आलेला आहे. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘बेवॉच’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी द रॉक अर्थात ड्वेन जॉनसन हादेखील भारतात येण्याची शक्यता आहे. बॉलिवूडमधील बरेचसे स्टार्स सध्या हॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखवित आहेत. ‘एक्सएक्सएक्स : द रिटर्न आॅफ झांडर केज’मध्ये विन डिझेलबरोबर बॉलिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पादुकोन मुख्य भूमिकेत आहे. तिच्या आग्रहास्तव विन डिझेल याने तब्बल दोन दिवस भारतात मुक्काम करून आपल्या सिनेमाचे जोरदार प्रमोशन केले होते. विनसोबत दीपिकाचा अंदाज त्यावेळेस खूपच चर्चिला गेला. माध्यमांमध्ये ज्या पद्धतीने विन आणि दीपिकाची केमिस्ट्री दाखविण्यात आली, त्यावरून या सिनेमाविषयी त्यांच्या फॅन्समध्ये कमालीची उत्सुकता वाढली होती. आता चॅकी चॅन भारतात आलेला आहे. त्याच्या ‘कुंग फू योगा’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी तो जागोजागी जाऊन सिनेमाचे प्रमोशन करीत असल्याने हा सिनेमा चर्चेत आला आहे. या सिनेमात त्याच्यासोबत सोनू सूद, एमी जॅक्सन हे बॉलिवूड स्टार्स झळकत असल्याने त्याची भारत भेटीला विशेष महत्त्व आलेले आहे. शिवाय जॅकी चॅनच्या फॅन्ससाठी त्याची एक झलक पर्वणीच ठरत असल्याने या सिनेमांविषयी फॅन्समध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. सूत्रानुसार द रॉक हादेखील त्याच्या ‘बेवॉच’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी भारतात येण्याची शक्यता आहे. या सिनेमात त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा झळकत असल्याने त्याला भारतात आणण्यासाठी ती खास प्रयत्न करीत आहे. दीपिकाने विन डिझेलला भारतात आणल्याने तिची बॉलिवूडमध्ये वेगळीच छाप पडली होती. अशाच प्रकारची छाप पाडण्यास प्रियंका उत्सुक असून, द रॉकचे भारतात येणे नक्की समजले जात आहे. द रॉक अर्थात ड्वेन जॉनसन हा हॉलिवूड अभिनेता म्हणून जेवढा प्रसिद्ध आहे, त्यापेक्षा ‘डब्ल्यूडब्ल्यूई’ या रेसलिंग शोचा सुपरस्टार म्हणून त्याला अधिक ओळखले जाते. बच्चे कंपनींमध्ये तर तो कमालीचा हिट आहे. अशात त्याचे भारतात एंट्री हे लक्षणीय ठरणार असून, त्याचा ‘बेवॉच’ या सिनेमाला पर्यायाने प्रियंका चोपडा हिच्या करिअरला खूप मोठा ब्रेक मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आता तो भारतात केव्हा येईल याविषयी त्याच्या फॅन्समध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे.