Join us

रॉक लिजेंड लियोन रसेल यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 18:50 IST

प्रसिद्ध अमेरिकी संगीतकार आणि रॉक अ‍ॅण्ड रोल लिजेंड लियोन रसेल यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी गेल्या रविवारी निधन झाले. ...

प्रसिद्ध अमेरिकी संगीतकार आणि रॉक अ‍ॅण्ड रोल लिजेंड लियोन रसेल यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी गेल्या रविवारी निधन झाले. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार त्यांची पत्नी जेन ब्रिजिजने सांगितले की, झोपेतच त्यांचे निधन झाले. गेल्या जुलै महिन्यात त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. अमेरिकेतील ओकलाहोमा राज्यात जन्मलेल्या रॉक लिजेंड लियोन रसेल यांनी आपल्या ५० वषार्पेक्षा अधिकच्या करिअरमध्ये पियानो वादन, गीत लेखन आणि निर्मितीमध्ये योगदान दिले आहे. त्यांनी लिहिलेल्या सुपरहिट गाण्यांमध्ये ‘डेल्टा लेडी’, ‘ए सॉन्ग फॉर यू’ या गीतांचा समावेश आहे. रसेल यांनी ‘कॉन्सर्ट फॉर बांग्लादेश’ मध्ये जॉर्ज हॅरिसन अ‍ॅण्ड फ्रेंडस यांच्यासोबत परफॉर्म केले होते. त्याचबरोबर संगीतकार जोडी डेलेने, बोनी अ‍ॅण्ड फ्रेंड्स, एडगार विंटर, न्यू ग्रास रिवाइवल, विली नेल्सन आणि एल्टन जॉन यांच्यासोबतही दौरे केले आहेत. २०११ मध्ये त्यांना रॉक अ‍ॅण्ड रोल हॉल आॅफ फेम आणि सॉन्गराइटर्स हॉल आॅफ फेममध्ये सहभागी केले होते. रसेल यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी सोशल मीडियावर त्यांच्या परिवाराप्रती दु:ख व्यक्त केले. त्यामध्ये एल्टन जॉन यांनी रसेल यांना प्रेरणा आणि मार्गदर्शक म्हणून संबोधले. रसेल यांचे संगीत क्षेत्रात प्रचंड योगदान राहिले आहे. त्यामुळे त्यांना लिजेंड अशी उपाधी दिली गेली होती. त्यांनी लिहिलेले बहुतांश गाणे हिट झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याचे प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. सोशल मीडियावर त्यांना मोठ्या संख्येने श्रद्धांजलीवर आधारित मेसेजेस शेअर केले जात आहेत.