Join us

रॉबर्ट डी नीरोने केले मेरिल स्ट्रीपचे समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2017 21:16 IST

७४व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात लाइफटाइम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या अभिनेत्री मेरिल स्ट्रीप हिने केलेले भाषण जगभरात कौतुकाचा विषय ...

७४व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात लाइफटाइम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या अभिनेत्री मेरिल स्ट्रीप हिने केलेले भाषण जगभरात कौतुकाचा विषय ठरत आहे. हॉलिवूडसह बॉलिवूडकरांनीही तिच्या भाषणाचे कौतुक करीत तिला समर्थन दिले आहे. आता या यादीत अभिनेता रॉबर्ड डी नीरो यांचेही नाव जुळले गेले असून, त्यांनी मेरिलला समर्थनार्थ पत्रच लिहले आहे. पीपुल्स डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार मेरिल स्ट्रीपने ८ जानेवारी रोजी झालेल्या पुरस्कार सोहळ्यात आपल्या भाषणात अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केली होती. मेरिलचे हे भाषण काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्याला जगभरातून समर्थन दिले गेले. अनेक सेलिब्रिटींनी तिला पत्र लिहून तिचे अभिनंदन केले. आता डी नीरो यांनी पत्र लिहून तिने ट्रम्प यांच्यावर साधलेला निशाना अतिशय योग्य असल्याचे म्हटले आहे. ग्लोडन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात भाषण देताना मेरिल स्ट्रीपडी नीरोने पत्रात म्हटले की, मेरिल स्ट्रीपने जे वक्तव्य केले ते समर्थनार्थ आहे. खरं तर ट्रम्प विरोधात कोणीतरी बोलणे अपेक्षित होते. त्यामुळे मेरिलने जे काही टीका केली ती कौतुकास पात्र आहे. त्यामुळे मी तिच्या भाषणाचा आदर करतो. तुझ्या भाषणाचे जगभरात कौतुक होत आहे. मी, तुझ्या विचाराचा पाइक असल्याचे डी नीरो यांनी म्हटले.  खरं तर मेरिल स्ट्रीपने तिच्या संपूर्ण भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. मात्र तिच्या संपूर्ण भाषणाचा रोख हा ट्रम्प यांच्याविषयी असल्याचा अर्थ स्पष्ट झाला. त्याचबरोबर ट्रम्प यांच्या विजयामुळे मेरिल स्ट्रीप दु:खी असल्याचेही स्पष्ट झाले. निवडणूक काळात मेरिल स्ट्रीप आणि रॉबर्ट डी नीरो या दोघांनीही हिलरी क्लिंटन हिचे समर्थन केले होते. रॉबर्ट डी नीरो आणि मेरिल स्ट्रीप