Join us

प्रियंकाची युनिसेफच्या गुडविल अ‍ॅम्बेसॅडरपदी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 21:39 IST

​आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:चा लौकिक वाढविणाºया अभिनेत्री प्रियंका चोपडा हिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. युनिसेफच्या ग्लोबल गुडविल अ‍ॅम्बेसॅडरपदी प्रियंकाची निवड करण्यात आली असून, तिची निवड भारतीयांसाठीदेखील अभिमानास्पद आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:चा लौकिक वाढविणाºया अभिनेत्री प्रियंका चोपडा हिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. युनिसेफच्या ग्लोबल गुडविल अ‍ॅम्बेसॅडरपदी प्रियंकाची निवड करण्यात आली असून, तिची निवड भारतीयांसाठीदेखील अभिमानास्पद आहे.  आपल्या अभिनयाने बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही दबदबा निर्माण करणारी प्रियंकाने आंतरराष्टÑीय स्तरावर सातत्याने झेप घेत आहे. दरम्यान, प्रियंकाने तिच्या निवडीचा आनंद आपल्या फॅन्सबरोबर शेअर करण्यासाठी इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर यूनिसेफ इव्हेंटचे काही फोटोज् शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ती दिग्गज फुटबॉलर डेविड बॅकहम, अभिनेता जॅकी चैन आणि बॉबी ब्राउन यांच्यासह अनेक दिग्गजांबरोबर पोज देताना दिसत आहे. यूएन हेडक्वॉर्टर येथे आयोजित केलेल्या यूनिसेफच्या ७० व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमास प्रियंका उपस्थित होती. प्रियंका गेल्या दहा वर्षांपासून युनिसेफची राष्टÑीय स्तरावरील गुडविल अ‍ॅम्बेसॅडर राहिलेली आहे. }}}} ">http://यावेळी प्रियंकाने तिच्या निवडीबद्दल बोलताना म्हटले की, माझी इच्छा आहे की मुलांवर कुठलेही दडपण असायला नको, त्यांना विचार करण्याची आणि मुक्त जगण्याचे स्वातंत्र द्यायला हवे. आज मानवाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे, परंतु मुलांवर हिंसा, दूरव्यवहार आणि त्यांचे शोषण सुरूच आहे. अशा अन्याय, अत्याचारग्रस्त मुलांचा आपण सर्वांनी आवाज बनायला हवे. यावेळी अत्याचारग्रस्त मुलांचे आयुष्य सुधारण्यासाठी युनिसेफने केलेल्या प्रयत्नांचे प्रियंकाने कौतुक केले. ती म्हणाली की, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी एकजूट व्हायला हवे. आपल्या मुलांसाठी एक चांगले जग निर्माण करण्यासाठी आपण संगळ्यांनी कटिबद्ध असायला हवे. युनिसेफचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. }}}} ">http://मी गेल्या दहा वर्षांपासून युनिसेफसोबत जोडली गेली आहे. त्यामुळे युनिसेफने दिलेल्या या नव्या जबाबदारीचा मी विनम्रतेने स्वीकार करतेय. युनिसेफसोबत गेले एक दशक काम करताना मी भारतातील अनेक गावांना भेटी दिल्या. तेथील तरुण मुली व त्यांच्या परिवारासोबत वास्तव्य केले. मुलींमध्ये एक परिवर्तनकारी ऊर्जा निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न केले, असेही तिने सांगितले. प्रियंका सध्या अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’च्या दुसºया सीजनमध्ये काम करीत आहे. अशात तिची ही निवड आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण समजली जात आहे.  ">http:// ">http://