Join us
Daily Top 2Weekly Top 5

न्यूयॉर्कच्या रस्त्यावर अशी बेधूंद नाचली प्रियांका चोप्रा! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 13:09 IST

न्यूयॉर्कच्या रस्त्यावर प्रियांकाने असे नाचत का सुटावे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 

देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. अमेरिकन सिंगर निक जोनाससोबतच्या तिच्या फोटोंची चांगलीच चर्चा होतेय. पण तूर्तास निक जोनाससोबतच्या नाही तर प्रियांकाच्या वेगळ्याच फोटोंची चर्चा रंगलीय. यात तिचा अंदाज काही वेगळाच दिसतोय. निक जोनासला विसरून न्यूयॉर्कच्या रस्त्यावर बेधूंद नाचत असलेली प्रियांका या फोटोत दिसतेय. 

पिंक कलरच्या लो नेक गाऊन तिचे सौंदर्य आणखीच खुलून आलेय. पण न्यूयॉर्कच्या रस्त्यावर प्रियांकाने असे नाचत का सुटावे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 

मात्र असा प्रश्न पडण्याचे काहीही कारण नाही. कारण हे फोटो प्रियांकाच्या ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’ या हॉलिवूडपटाचे आहे. प्रियांका लवकरच या हॉलिवूडपटात दिसणार आहे. त्याच्याच शूटींगचे हे फोटो आहेत. 

सध्या न्यूयॉर्कमध्ये या चित्रपटाचे शूटींग सुुरू आहे. या फोटोतील प्रियांका मस्तीमूडमध्ये आहे. एका फोटोत तिच्या हाती गुलाबाचे फुल आहे. यावरून ती कुणाला तरी प्रपोज करायला जात असल्याचे वाटते. 

प्रियांकाच्या टीमने हे सुंदर फोटो शेअर केले आहेत. तुम्हीही ते बघा आणि कसे वाटलेत, ते सांगायला विसरू नका.‘इजन्ट इट रोमॅन्टिक’ या चित्रपटात प्रियांकाशिवाय एडम डेवाइन, लियाम हेम्सवर्थ, रिबेल विल्सन आणि बेटभ गिलपीन मुख्य भूमिकेत आहेत. 

लवकरच प्रियांका ‘भारत’ या बॉलिवूडपटाचे शूटींग सुरु करणार आहे. यात ती सलमान खानसोबत दिसेल. याशिवाय ‘स्काय इज पिंक’ हा आणखी एक हिंदी सिनेमा तिने साईन केला आहे. यात ती फरहान अख्तरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

 

टॅग्स :प्रियंका चोप्रा