Join us

‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 17:09 IST

‘क्वांटिको-३’चा प्रोमो समोर आला असून, त्यामध्ये प्रियांका चोप्रा जबरदस्त अ‍ॅक्शन अंदाजात बघावयास मिळत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अमेरिकेत अतिशय लोकप्रिय असलेल्या ‘क्वांटिको’ या थ्रिलर मालिकेचा तिसरा सीजन २६ एप्रिल रोजी सुरू होत आहे. ‘क्वांटिको’साठी अभिनेत्री प्रियांका चोप्राने प्रचंड मेहनत घेतली असून, त्याचा प्रत्यय नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडीओमधून होत आहे. प्रियांकाने तिच्या आॅफिशियल फॅन पेजवर एक व्हिडीओ अपलोड केला असून, त्यात तिचा अंदाज बघण्यासारखा आहे. या व्हिडीओ ‘क्वांटिको’ सीजन-३चा प्रोमो असल्याचे सांगितले जात आहे. या प्रोमोमध्ये प्रियांका जबरदस्त अंदाजात दिसत आहे. एलॅक्स पॅरिशच्या भूमिकेत असलेली प्रियांका पुन्हा एकदा धमाका करण्याच्या तयारीत आहे. कारण प्रोमोमध्ये प्रियांका ग्लॅमरस, तर दिसत आहेच, शिवाय तिचा अ‍ॅक्शन अंदाजही बघण्यासारखा आहे. ‘क्वांटिको’ एक अमेरिकन ड्रामा थ्रिलर आहे. या मालिकेची सुरुवात सप्टेंबर २०१५ मध्ये झाली होती. मालिकेत मुख्य भूमिकेसाठी प्रियांका चोपडाला कास्ट केले होते. त्यामुळे प्रियांका चोपडा बॉलिवूडमधील पहिली अशी अभिनेत्री आहे, जिला विदेशी मालिकेत मुख्य भूमिका साकारण्यास मिळाली. या मालिकेमुळे प्रियांकाला विदेशी धर्तीवर जबरदस्त लोकप्रियता मिळाली आहे. त्याचबरोबर हॉलिवूडमध्येही तिने दबदबा निर्माण केला आहे. या मालिकेच्या दोन्ही सीजनमध्ये प्रियांकाच्या भूमिकेने छाप पाडली असून, तिसºया सीजनमध्येही ती असाच काहीसा कारनामा करेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.  दरम्यान, प्रियांका सध्या ‘क्वांटिको’ची शूटिंग पूर्ण करून भारतात परतली असून, ती काही बॉलिवूडपटांवर सध्या काम करीत आहे. सूत्रानुसार, ती सलमान खानच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटात झळकणार आहे. या अगोदर सलमान आणि प्रियांकाने ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात काम केले आहे. बºयाच वर्षांपासून प्रियांका एकाही बॉलिवूडपटात झळकली नाही. अशात तिच्या चित्रपटाची चाहत्यांना प्रतीक्षा लागली आहे.