Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘वेडिंग क्रॅशर्स २’ची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 15:02 IST

‘फिस्ट फाईट’चे लेखक एव्हान ससेर आणि वॅन रॉबिशॉक्स सिक्वेलची पटकथा लिहित आहेत.

ओवेन विल्सन आणि विन्स वॉन स्टारर सुपरहीट कॉमेडी चित्रपट ‘वेडिंग क्रॅशर्स’च्या सिक्वेलवर सध्या काम सुरू असून ‘फिस्ट फाईट’चे लेखक एव्हान ससेर आणि वॅन रॉबिशॉक्स त्याची पटकथा लिहित आहेत. चित्रपटात काम केलेल्या इस्ला फिशरने एका मुलाखती दरम्यान याविषयी माहिती दिली. तिने सांगितले की, ‘विन्स वॉनने मला एका पार्टीत सिक्वेलवर काम सुरू असल्याचे सांगितले. सविस्तर माहिती देण्यस मात्र त्याने नकार दिला.’ डेव्हिड डॉबकिन दिग्दर्शित मूळ चित्रपटाने २००५ साली बॉक्स आॅफिसवर चांगलीच कमाई केली होती. केवळ ४० मिलियनच्या बजेटवर त्याने २८५ मिलियन डॉलर्सचा गल्ला जमवला होता.‘वेडिंग क्रॅशर्स’ ही दोन मित्रांची गोष्ट आहे. विल्सन आणि वॉन दोघे मित्र मुलींना भेटण्यासाठी आमंत्रण नसताना कोणत्याही लग्नात सामील होत असतात. सिक्वेलमध्ये ओरिजिनल चित्रपटातील वॉन, विल्सन, इस्ला फिशर, रेचल मॅक् अ‍ॅडम्स, ब्रॅडली कूपर किंवा विल फॅरेल अशा कोणत्याच कलाकाराशी अद्याप करार करण्यात आलेला नाही.वेडिंग क्रॅशर्स :चित्रपटातील एक सीनदोन वर्षांपूर्वी डॉबकिनने सिक्वेलबाबत एक रंजक खुलासा केला होता. डॉबकिन, वॉन आणि विल्सन यांनी त्याच काळात सिक्वेलची योजना आखली होती. तिघांनी मिळून एक कथासुद्धा तयार केली होती. त्यांना सिक्वेलमध्ये जेम्स बाँड फेम डॅनियल क्रेग हवा होता. त्याचे गुड लूक्स आणि चार्ममुळे तो या दोन मित्रांना ‘वेडिंग क्रॅशिंग’च्या बिझनेसमध्ये चांगलीच टक्कर देतो अशी काहीशी ती कथा होती. परंतु ते काही त्यावेळी शक्य झाले नाही.तो सांगतो, ‘डॅनियल सर्वाेत्कृष्ट वेडिंग क्रॅशर म्हणून आमच्या डोक्यात होता. पण दहा वर्षांपूर्वी आजच्याप्रमाणे सिक्वेलची क्रेझ नव्हती. म्हणून ती कल्पना केवळ कल्पना बनुनच राहिली.’