Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रॅटने विमानाच्या बाथरुममध्ये केला सेक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 22:17 IST

हॉलिवूड अभिनेता ख्रिस प्रॅट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. माध्यमांमध्ये तो सातत्याने झळकत आहे. त्यास कारणही तसेच असून, त्याने ...

हॉलिवूड अभिनेता ख्रिस प्रॅट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. माध्यमांमध्ये तो सातत्याने झळकत आहे. त्यास कारणही तसेच असून, त्याने केलेल्या खुलाशामुळे खळबळ उडाली आहे. एका वेबसाइटने ख्रिस प्रॅट आणि सहकलाकार जेनिफर लॉरेन्स यांनी एका अद्भुत ठिकाणी सेक्स केल्याची माहिती प्रसिद्ध केली होती. त्यावर ख्रिसने शिक्कामोर्तब केल्याने तो चर्चेत आला आहे. पिपल डॉट कॉम या वेबसाइटने काही दिवसांपूर्वी ख्रिस प्रॅट आणि जेनिफर लॉरेन्स यांच्याविषयी माहिती प्रसिद्ध करताना त्यांनी एका अद्भुत ठिकाणी सेक्स केल्याचा दावा केला होता. मात्र यावर दोघांकडूनही कुठल्याच प्रकारची प्रतिक्रिया न दिल्याने याविषयी त्यांच्या फॅन्समध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आता या रहस्यावरचा पडदा दस्तुरखुद्द ख्रिस प्रॅटनेच उघडला आहे. त्याने या वृत्ताला दुजोरा देताना म्हटले की, मी आणि माझी सहकलाकार जेनिफर लॉरेन्सने विमानाच्या बाथरुममध्ये सेक्स केला होता. ‘पॅसेंजर’ या चित्रपटाच्या शूटिंगवेळी हा प्रसंग घडला होता. दोघेही जेव्हा एका शोमध्ये गेले होते, तेव्हा त्यांना याविषयी विचारण्यात आले होते. यावेळी जेनिफरनेही हे सर्व खरे असल्याचे म्हटले आहे. तसेच पॅसेंजर हा रोमॅँटिक सायन्स फिक्शन थ्रिलर असून, या चित्रपट प्रेक्षकांना काही तरी अद्भुत बघायला मिळेल, असेही तिने सांगितले. दोघांकडून दिली गेलेली सेक्सबाबतची कबुली ही प्रमोशनल स्ट्रॅटेजी होती की आणखी काय? असाही सूर जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पॅसेंजर हा चित्रपट मॉर्टन टील्डम यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट जॉन स्पाइट्स यांनी लिहिला आहे.ख्रिस प्रॅट आणि जेनिफर लॉरेन्स