इंटरनॅशनल स्टार केंडल जेनरसोबत सुशांत सिंग राजपूतचे फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 16:21 IST
मनोरंजन विश्वात रस असणाऱ्या तमाम लोकांसाठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे इंटरनॅशनल स्टार आणि किम कार्देशियनची बहीण केंडल जेनर भारतात आली ...
इंटरनॅशनल स्टार केंडल जेनरसोबत सुशांत सिंग राजपूतचे फोटोशूट
मनोरंजन विश्वात रस असणाऱ्या तमाम लोकांसाठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे इंटरनॅशनल स्टार आणि किम कार्देशियनची बहीण केंडल जेनर भारतात आली होती. ‘गुलाबी शहर’ जयपूर येथे ती एका मॅगझीनच्या फोटोशूटसाठी दोन दिवस होती. कोणालाचा याची कानोकान खबर लागली नाही.पण तुम्हाला यापेक्षाही मोठी शॉकिंग बातमी माहित आहे का? तिच्या या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यात ती कोणासोबत होती? तो दुसरा-तिसरा कोणी नसून सुशांत सिंग राजपूत आहे. होय, सुशांतसिंग आणि केंडल हे दोघे जयपूरमध्ये एकत्र होते. एका मॅगझीनच्या आगामी कव्हरवर सुशांत आणि केंडल झळकणार आहेत. जयपूरच्या समोद पॅलेसमध्ये हा फोटोशूट पार पडला. आंतररष्ट्रीय ख्यातीचे फोटोग्राफर मारिओ टेस्टिनो यांनी सुशांत आणि किंडेलचे फोटो शूट केले. किंडेलचा हा छोटा भारत दौरा अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता. ती दोन दिवस येथे होती याची कोणालाच कल्पना नव्हती. विकेंडला ती जयपूर विमानतळावरून दिल्लीला जाताना दिसली. यावेळी तिने चाहत्यांसोबत फोटोदेखील काढले. सुशांतलासुद्धा जयपूर विमातळावर क्लिक करण्यात आले. आता सुशांत आणि किंडेल अशी जोडी कशी जमून आली याबाबत काहीच माहिती उपलब्ध नाही. मात्र, टीव्ही टू बॉलीवूड असा प्रवास करणाºया सुशांतची पोहोच आता आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचली आहे असे म्हणावे लागेल. महेंद्र सिंग धोनी बायोपिकचा त्याला नक्कीच फायदा झाला, असे दिसतेय.‘किपिंग अप विथ द कार्देशियन’ या रिअॅलिटी शोमधून प्रसिद्धीस आलेली किंडेल एक लोकप्रिय सेलिब्रेटी आहे. हॅरी स्टायलससोबतच्या अफेयरमुळेही ती चर्चेत होती. इन्स्टाग्रामवर सक्रीय राहणाºया किंडेलसोबत सुशांतच फोटो पाहण्याची आम्हाला आतूरता लागली आहे.