Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कायली जेनरचे ‘अजगरा’सोबत फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 13:37 IST

कायलीने २०१७ सालाचे स्वत:चे कॅलेंडर बनवले असून त्यामध्ये तिचे एक्सक्लुझिव्ह फोटोज असणार आहेत.

प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी स्टार आणि आता स्वयंउद्योजिका म्हणून उदयास आलेल्या कायली जेनरने आपल्या फॅन्सना नववर्षाच्या निमित्त एक खास भेट देण्याची प्लॅनिंग केली आहे. कायलीने २०१७ सालाचे स्वत:चे कॅलेंडर बनवले असून त्यामध्ये तिचे एक्सक्लुझिव्ह फोटोज असणार आहेत.नुकतीच सोशल मीडियावर त्याची पहिली झलक तिने शेअर केली. या १९ वर्षीय कॉस्मेटिक्स क्वीनने इन्स्टाग्रामवर घोषणा केली की, ‘२०१७च्या निमित्ताने मी माझे पहिलेच कॅलेंडर बनवले आहे. प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर टेरी रिचर्डसनने त्यासाठी माझे एक्स्क्लुझिव्ह फोटोज काढले आहेत.’यासोबत तिने तिचा लेसी ब्रा आणि डोक्यावर काळा मुकूट परिधान केलेला कव्हर फोटो पोस्ट केला. तसेच एका व्हिडिओमध्ये कॅलेंडर दाखवताना तिने एक इनसाईड फोटोसुद्धा शेअर केला. यामध्ये ती पोटावर झोपलेली असून तिच्या अंगाभोवत बोआ कन्स्ट्रिक्टर प्रजातीच्या अजगराने विखळा घातलेला आहे.इनसाईड फोटो दाखवताना कॅप्शन दिले की, ‘खरं तर मला कॅलेंडरमधील फोटो गुपित ठेवायचे आहेत पण तुम्हा चाहत्यांना सरप्राईज देण्यासाठी मी एप्रिल महिन्याच्या पानावरील फोटो दाखवते. टेरी तु काय मस्त फोटो क्लिक केला आहेस!’या फोटोत कायलीने लाल रंगाच्या फिशनेट बॉडी सुटसोबत काळ्या रंगाची अंतरवस्त्रे आणि ‘प्लीज इन्सर्ट मनी’ लिहिलेला टी-शर्ट घातलेला आहे. १० डिसेंबर रोजी हे कॅलेंडर प्रकाशित होणार आहे. गॉर्जिअस :कायली जेनरप्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर टेरी रिचर्डसनने यापूर्वी ‘गलोर’ मॅगझीनसाठी कायलीच्या १८ व्या वाढदिवसानिमित्त फोटोशूट केलेले आहे. कायलीची मोठी बहीण किम कार्देशियनचादेखील फोटोज त्याने काढलेले आहेत.२०१६ हे वर्ष कायलीसाठी फार लाभदायक ठरले आहे. तिने कॉस्मेटिक्सच्या उत्पादनांची श्रृंखला सुरू केलेली असून तिला प्रचंड प्रतिसाद लाभला. आता या कॅलेंडरच्या माध्यमातून पुढील वर्षदेखील गाजवण्याची तयारी तिने सुरू केली असेच म्हणावे लागेल.