निकोलला हवीत आणखी मुले दत्तक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 20:05 IST
अभिनेत्री निकोल किडमन आणखी मुले दत्तक घेवू इच्छिते. पहिल पती टॉम क्रुझ याच्या इसाबेल (२३) आणि कोनोर (८) या ...
निकोलला हवीत आणखी मुले दत्तक
अभिनेत्री निकोल किडमन आणखी मुले दत्तक घेवू इच्छिते. पहिल पती टॉम क्रुझ याच्या इसाबेल (२३) आणि कोनोर (८) या दोन मुली तिने यापूर्वीच दत्तक घेतल्या आहेत. तसेच पती कीथ अर्बन याच्यापासून देखील तिला फेथ (५) आणि संडे रोज (८) नावाची मुले आहेत. अशातही निकोल आणि अर्बन आणखी काही मुले दत्तक घेण्याच्या विचारात आहेत. सूत्रानुसार आॅस्कर विजेत्या निकोल किडमनने १९९५ मध्ये आलेल्या तिच्या ‘टू डाय फॉर’ या चित्रपटातील भूमिकेसाठी निर्मात्यांकडे अक्षरश: भीक मांगितली होती. त्या आठवणींना उजाळा देताना निकोलने सांगितले की, त्यावेळच्या स्थितीचा विचार केल्यानंतर मी खरोखरच भारावून जाते. करिअरमधील चढउतार काय असतात, याची जाणीव मला १९९५ चा प्रसंग आठवल्यानंतर होतो. या चित्रपटात तिचा सहअभिनेता असलेला टॉम क्रुज याच्यासोबतच्या आठवणीही निकोल सांगते. आमची केमेस्ट्री खूप चांगली जमली होती. वास्तविक टॉम माझ्यासोबत या चित्रपटात काम करण्यास अजिबात उत्सुक नव्हता. त्यावेळेस टॉमच्या करिअरचा सुवर्णकाळ सुरू होता. त्यामुळे त्याच्यासोबत काम करणे प्रत्येक अभिनेत्रींचे स्वप्न होते. त्यामुळे मी या चित्रपटात काम मिळावे म्हणून निर्मात्यांकडे विनवण्या केल्या. या चित्रपटानंतर किडमन हॉलिवूडमधील सर्वाधिक महागडी अभिनेत्री बनली. ती तिच्या करिअरबाबत जेवढी सतर्क आहे, तेवढीच ती परिवाराबाबत देखील जागरूक आहे. मुलांच्या पालनपोषणात ती कधीच निष्काळजीपणा करीत नाही. तिच्या मते, तुमच्या घरात मुले असतील तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. कारण तुम्ही मुलांना कधीच नाही म्हणू शकत नाही. अभिनेत्री निकोल किडमॅन तिच्या मुलींसोबत...