Join us

OMG : ‘या’ अभिनेत्रीचा बॉयफ्रेंडनेच इंटिमेट व्हिडीओ काढून विकला पोर्न साइटला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 14:29 IST

हॉलिवूड अभिनेत्री मीशा बार्टन सध्या तिच्या आयुष्यातील अतिशय वाईट काळाचा सामना करीत आहे. कारण तिने नुकताच तिच्या एक्स बॉयफ्रेंडविषयी ...

हॉलिवूड अभिनेत्री मीशा बार्टन सध्या तिच्या आयुष्यातील अतिशय वाईट काळाचा सामना करीत आहे. कारण तिने नुकताच तिच्या एक्स बॉयफ्रेंडविषयी असा काही धक्कादायक खुलासा केला आहे की, हॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मीशाने दिलेल्या माहितीनुसार तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्यासोबत व्यतित केलेल्या खासगी क्षणांचा व्हिडीओ काढून तो एका पोर्न साइट्सला विकण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या व्हिडीओसाठी आॅनलाइन पॉर्न कंपन्यांकडून बोली लावण्याचे काम सुरू केले आहे. मात्र मीशाने लिगल अ‍ॅक्शन घेण्यासाठी कंबर कसल्याने या कंपन्यांनी तूर्तास माघार घेतल्याचे बोलले जात आहे. हॉलिवूडचा व्हिडीओ ब्रोकर केविन ब्लॅटने याविषयी सांगितले की, माझ्याकडे एक व्यक्ती हा व्हिडीओ घेऊन आली होती. माझ्याकडे येण्याअगोदर बºयाचशा ठिकाणी हा व्हिडीओ सर्कुलेट केला गेल्याचे तिने सांगितले. काही दिवसांपूर्वीच अशा बातम्या आल्या होत्या की, मीशा बार्टनचा हा सेक्स व्हिडीओ पॉर्नोग्राफी साइट्सवर अपलोड करण्यात आला आहे. त्यानंतर मीशाने तिची अटॉर्नी लीजा ब्लूम हिच्यासोबत लगेचच मीडियाशी चर्चा करताना याविषयीचा खुलासा केला होता. न्यूज एजन्सी आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार, मीशाने सांगितले की, ‘हा माझ्यासाठी खूपच कठीण काळ आहे. कारण जेव्हा मला कळले की, ज्या व्यक्तीवर मी प्रेम केले, जिच्यावर मी विश्वास ठेवला तिनेच माझ्यासोबतच्या खासगी क्षणांचा हिडन कॅमेºयाच्या माध्यमातून व्हिडीओ शूट करून तो विकला तेव्हा मला खूपच दु:ख झाले. हा व्हिडीओ पब्लिकली करताना त्याने थोडासादेखील विचार केला नाही का? असा प्रश्नही मीशाने उपस्थित केला. मीशाने १९९७ मध्ये आलेल्या ‘लॉन डॉग्स’ या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर ती ‘पप्स, स्किप्ड पार्ट्स, आॅक्टेन आणि विर्जन टेरिटरी’ यांसारख्या सिनेमांमध्ये बघावयास मिळाली. आता ती या व्हिडीओ प्रकरणामुळे चर्चेत आली असून, कायद्याचा आधार घेऊन ती या प्रकरणाचा छडा लावणार असल्याचे तिने बोलून दाखविले आहे. दरम्यान, हा व्हिडीओ पॉर्न साइट्सवर अपलोड केला की नाही, याविषयी मात्र सस्पेन्स आहे.