निकोल प्रेमात बनतेय ‘मूर्ख’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 22:07 IST
‘प्रेम आंधळं असतं’ ही म्हण आपण नेहमीच ऐकत असतो; मात्र ही म्हण प्रसिद्ध गायिका निकोल शेरजिंगर हिच्याबाबतीत खरी ठरत ...
निकोल प्रेमात बनतेय ‘मूर्ख’
‘प्रेम आंधळं असतं’ ही म्हण आपण नेहमीच ऐकत असतो; मात्र ही म्हण प्रसिद्ध गायिका निकोल शेरजिंगर हिच्याबाबतीत खरी ठरत आहे. कारण तिच्या मते, तिला प्रेमात कोणीही मूर्ख बनवू शकतो. फिमेल फर्स्ट या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार ‘पुसीकॅट डॉल्स’ची माजी सदस्य ३८ वर्षीय निकोल शेरजिंगर हिची ‘प्रेम’ सगळ्यात मोठी कमजोरी आहे. याविषयी ती म्हणते की, मला प्रेमात कोणीही मूर्ख बनवू शकतो. मी जेव्हा प्रेमात पडते, तेव्हा काही काळानंतर ती व्यक्ती माझ्याशी फ्लर्ट करीत आहे, याची जाणीव होऊनदेखील मी त्याच्यापासून दूर जाऊ शकत नाही. निकोल शेरजिंगर आणि फॉर्म्युला वनचा स्टार लुईस हॅमिल्टनपरंतु जेव्हा तो माझ्यापासून दूर जातो तेव्हा मला खूप त्रास होतो. अशातही मला त्याच्याशी वाद घालणे किंवा जाब विचारण्याची हिंमत होत नाही. पुढे बोलताना निकोलने सांगितले की, जेव्हा मी घराबाहेर असते, तेव्हा घरच्यांना खूप मिस करते. परंतु मी यावेळी ‘जीवनात नवी सुरुवात, नवा अध्याय’ सुरू करण्याच्या विचाराने पुन्हा या सगळ्या नकारात्मक विचारांना दूर सारते. अर्थात हे करणे खूप जोखमीचे असते. कारण जेव्हा मन तुटते तेव्हा त्याचे घाव खोलवर रुतलेले असतात. निकोलने फॉर्म्युला वनचा स्टार लुईस हॅमिल्टन याला डेट केले आहे; मात्र काही काळानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. आता निकोल दुसºयाच्या प्रेमात पडली की लुईससोबतच्याच आठवणींचा तिला त्रास होत आहे, हे सांगणे जरा अवघडच आहे. परंतु ‘प्यार मे धोके’ ही आता कॉमन बाब झाली आहे, हेही तेवढेच खरे. \निकोल शेरजिंगर आणि फॉर्म्युला वनचा स्टार लुईस हॅमिल्टन