निकोलला लहानपणीच व्हायचे होते आई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 21:39 IST
हॉलिवूड अभिनेत्री निकोल किडमेनचे म्हणणे आहे की, तिला लहानपणीच आईची जबाबदारी पार पाडायची होती. तसेच मी काही मुलांना दत्तक ...
निकोलला लहानपणीच व्हायचे होते आई
हॉलिवूड अभिनेत्री निकोल किडमेनचे म्हणणे आहे की, तिला लहानपणीच आईची जबाबदारी पार पाडायची होती. तसेच मी काही मुलांना दत्तक घेईल हेही मला लहानपणापासूनच वाटत होते. निकोलने टॉम क्रुझ याचे इसाबेल (२३) आणि कॉर्नर (२०) ही दोन मुले दत्तक घेतली आहेत. तर पती किथ अर्बन याच्यापासून फॅथ (५) आणि संडे रोज (८) हे दोन मुले आहेत. याविषयी निकोलने सांगितले की, मला लहानपनापासूनच वाटत होते की, मी मुलांना दत्तक घेईल. मला लहान मुलांचे प्रचंड आकर्षण असून, सदैव आईच्या भूमिकेत राहावयास वाटेल. मी जेव्हा लहान होते तेव्हाच मुलांचा विचार करीत होते. मात्र मी मुलांना कधी जन्म देणार हे मात्र मला माहिती नव्हते. त्यामुळे मी पहिलाच मुलगा दत्तक घेऊन आई होण्याची माझी इच्छा पूर्ण केली. आज चार मुलांचा सांभाळ करीत असून, मी अतिशय खूश आहे, असेही निकोलने सांगितले.