Join us

निकीचा पुन्हा हॉट अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 16:03 IST

हॉलिवूड मॉडल तथा सिंगर निकी मिनाज हिने हिच्या एका व्हिडीओने सध्या खळबळ उडवून दिली आहे. व्हिडीओमध्ये निकीने दिलेल्या बोल्ड ...

हॉलिवूड मॉडल तथा सिंगर निकी मिनाज हिने हिच्या एका व्हिडीओने सध्या खळबळ उडवून दिली आहे. व्हिडीओमध्ये निकीने दिलेल्या बोल्ड दृश्यांनी सर्व परीसीमा पार केल्या आहेत. तिचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा तसेच वादाचा विषय ठरला आहे. त्रिनिदाद येथे जन्मलेली निकी मिनाज अमेरिकेची प्रसिद्ध सिंगर आहे. २०१४ मध्ये निकीचा रिलिज झाला, ‘माय अ‍ॅनाकोंडा’ या गाण्याने अक्षरश: धूम उडवून दिली होती. आता पुन्हा निकीने अशाच प्रकारचा व्हिडीओ शूट केल्याने एकच खळबळ उडाली आहे. गाण्यात निकीने बोल्ड दृश्य दिल्याने सध्या ती वादातही सापडली आहे. निकीचे नेहमीच अमेरिकेच्या गौरवर्णीय सिंगर्ससोबत वाद झाले आहेत. स्पर्धेच्या दृष्टीनेच तिने या सिंगर्सना धोबीपछाड देण्यासाठी अतिशय बोल्ड गाणी शूट केले आहेत. दरम्यान, निकीने या व्हिडीओचे काही बोल्ड फोटोज् सोशल मीडियावर पोस्ट केल्याने इतर सिंगर्समध्ये खळबळ उडाली आहे. निकी नेहमीच तिचे हॉट फोटोज् सोशल मीडियावर शेअर करीत असते.