Join us
Daily Top 2Weekly Top 5

निओमी फॅशन जगताची राणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2016 20:17 IST

रॅपर विलियम सुपरमॉडल निओमी कॅँपबेल हिला फॅशन जगताची राणी मानतो. विलियमने नुकतेच त्याच्या नव्या ब्लूटूथ ईयरफोन ब्रांड बटंसचे निओमीबरोबरच ...

रॅपर विलियम सुपरमॉडल निओमी कॅँपबेल हिला फॅशन जगताची राणी मानतो. विलियमने नुकतेच त्याच्या नव्या ब्लूटूथ ईयरफोन ब्रांड बटंसचे निओमीबरोबरच लॉँचिंग केले. फिमेलफर्स्ट डॉट को डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार विलियमने त्याच्या ब्लूटूथ ब्रॅण्डसाठी निओमीला आमंत्रित केले होते. यावेळी त्याने तिला फॅशनची राणी असे संबोधले. त्याच्या मते निओमी फॅशनची तर युवा मॉडल केंडल जेनर बिझनेसची राजकुमारी आहे. लीजेंड या साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत विलियमने सांगितले की, मी स्वत: शोबिजचा भाग राहिलो आहे. काही काळानंतर मी बिझनेसकडे वळालो. सध्या माझी स्वतंत्र कंपनी असून, त्यातून मला सेलिब्रिटी जगतात वावरणे सोपे झाले आहे. माझ्या मते कॅटवॉकसाठी निओमी ही फॅशन जगतातील राणी आहे. तर केंडलनेही बिझनेस जगतात स्वत:चे वलय निर्माण केले आहे. तिच्यासोबत जुळल्याचा मला अभिमान वाटतो, असेही त्याने सांगितले.