Join us
Daily Top 2Weekly Top 5

​नील आर्मस्ट्राँगच्या भूमिकेत दिसणार हा ‘स्टार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2017 17:19 IST

चंद्रावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्राँगची मोठ्या पडद्यावर भूमिका साकारण्यासाठी एका प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्याची निवड करण्यात आली आहे. जेम्स ...

चंद्रावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्राँगची मोठ्या पडद्यावर भूमिका साकारण्यासाठी एका प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्याची निवड करण्यात आली आहे. जेम्स हॅन्सेन लिखित ‘फर्स्ट मॅन : अ लाईफ आॅफ नील ए. आर्मस्ट्राँग’ पुस्तकावर आधारित या बायोपिकमध्ये रायन गॉस्लिंग आर्मस्ट्राँगची भूमिका करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.या निमित्ताने दिग्दर्शक डेमियन चॅझेल आणि रायन पुन्हा एकदा एकत्र येण्याचा योग जुळून आला आहे. डेमियनने नुकतेच रायनला घेऊन ‘ला ला लँड’ नावाचा सिनेमा केला. त्यासाठी दोघांनाही आपापल्या कॅटेगरीमध्ये गोल्ड ग्लोब पुरस्काराचे नामांकन मिळाले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या आॅस्करसाठीसुद्धा ते फेव्हरेटस् आहेत.चित्रपटाची घोषणा झाल्यापासून आर्मस्ट्राँगची भूमिका कोण करणार यावर निर्माते आणि सिनेरसिकांमध्ये खल सुरू होता. अखेर मुलींच्या हृदयाचा राजा रायन गोस्लिंगचे नाव निश्ति करण्यात आले; मात्र अनेकांनी दिग्दर्शक म्हणून डेमियनच्या निवडीवर शंका उपस्थित केली आहे. कारण त्याला अद्याप बिग बजेट साय-फाय चित्रपट बनविण्याचा अनुभव नाही. म्हणून आर्मस्ट्राँगच्या बायोपिकला तो योग्य न्याय देऊ शकणार नाही अशी त्यांना भीती वाटते. पंरतु निर्मात्यांना असे वाटत नाही. फर्स्ट मॅन : नील आर्मस्ट्रॉग (डावीकडे); तो जेव्हा चंद्रावर उतरला होता तेव्हाचा फोटा (उजवीकडे)त्यांच्या मते, डेमियनच्या यापूर्वीच्या - ‘व्हिपलॅश’ आणि ‘ला ला लँड’ - या दोन्ही चित्रपटांत वैयक्तिक महत्त्वकांक्षेपोटी केली जाणारी प्रयत्नांची पराकाष्ठा दाखवण्यात आलेली आहे. आणि चंद्रावर पहिले पाऊल ठेवण्यापेक्षा मोठी महत्त्वाकांक्षा दुसरी कोणती असू शकते? त्यामुळे डॅमियन हा चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी एकदम योग्य आहे.cnxoldfiles/a> रिलीज करण्यात आली. ​तो या चित्रपटात तो ‘आॅफिसर के’ नावाची भूमिका साकारत आहे.