Join us

मुलगी कॅरी फिशरच्या निधनाच्या दु:खात आई डेबीरेनॉल्ड्सनेसुद्धा सोडले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 14:22 IST

हॉलीवूडसाठी या वर्षाची सांगता फारशी चांगली झाली नाही. इंग्लिश सिनेमासृष्टीवर अधिराज्य गाजवेलेली अभिनेत्री कॅरी फिशरच्या मृत्यूनंतर तिची आई आणि ...

हॉलीवूडसाठी या वर्षाची सांगता फारशी चांगली झाली नाही. इंग्लिश सिनेमासृष्टीवर अधिराज्य गाजवेलेली अभिनेत्री कॅरी फिशरच्या मृत्यूनंतर तिची आई आणि हॉलीवूड अ‍ॅक्ट्रेस डेबी रेनॉल्ड्सनेसुद्धा या जगातून निरोप घेतला आहे. मुलीच्या निधनाचे दु:ख सहन न झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे मुलगा टॉड फिशरने सांगितले.‘सिंगिंग इन द रेन’ (१९५२) या प्रसिद्ध चित्रपटात डेबी यांनी जेन केलीसोबत काम केले होते. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली. मुलगा टॉडच्या बेव्हर्ली हिल्स येथील घरी त्या मुलगी कॅरीच्या अंत्यसंस्काराची तयारी करीत होत्या.तेव्हा अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. त्यांना श्वास घेण्यात अडचणी येत होत्या. काही तासांनंतर त्यांना मृत घोषीत करण्यात आले. ‘मला कॅरीला भेटायचे’ अशी त्यांची शेवटची इच्छा होती.पन्नास आणि साठच्या दशकामध्ये डेबी विविध कॉमेडी आणि संगीतप्रधान चित्रपटांमुळे प्रकाश झोतात आल्या होत्या. वयाच्या केवळ १९ व्या वर्षी ‘सिंगिंग इन द रेन’सारख्या तुफान लोकप्रिय चित्रपटात झळकली. १९६४ साली तिला ‘अनसिंकेबल मॉली ब्रॉऊन’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे आॅस्कर नामांकन मिळाले होते. गेल्या वर्षी तिला ‘स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड’तर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. म्युज : डेबी रेनॉल्डस्​तत्पूर्वी कॅरी फिशर (६०) हिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. स्टार वार्स या चित्रपटात प्रिन्सेस लियाची भूमिका साकारणाºया कॅरीला २३ डिसेंबर रोजी लंडनहून लॉस एंजिलिसला येताना विमानाच्या लॅण्डिंगवेळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. तेव्हापासून ती यूसीएलए मेडिको सेंटर येथे आयसीयूमध्ये उपचार घेत होती. मंगळवारी (दि. २७) तिचे निधन झाले.शोकसंदेश डेबीच्या निधनाची बातमी कळताच अनेक सेलिब्रेटींनी शोकसंदेश पोस्ट केले. ‘हॉलीवूड रॉयल्टी’मधील शेवटची सदस्य आता आपल्याला सोडून गेली आहे, अशी प्रतिक्रिया स्टार ट्रेक अभिनेता विल्यम शॅटनरने दिली. बेट मिडलर म्हणाली की, ‘हे जे काही घडत आहे ते माझ्या आकलनाच्या पलिकडे आहे. रुपवान आणि अभिनयाला वाहून घेतलेल्या डेबीने मुलीपाठोपाठ आपला निरोप घेतला.’‘हॉलीवूड वॉक फेम’ येथे डेबीला श्रद्धांजली वाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. तेथे उपस्थित एकाने म्हटले की, ‘सध्या खूपच दु:खद काळ सुरू आहे. वर्षाअखेरीस अनेक कलाकारांचे निधन होताना पाहून खूप वेदना होत आहेत. या वर्षाची सांगता अशा प्रकारे होईल असा कोणीच विचार केला नसेल. कला क्षेत्राची ही खूप मोठी हानी आहे.’