मार्निंग सिकनेसने त्रस्त झाली गर्भवती बियॉन्से
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 13:57 IST
गर्भवती गायिका बियॉन्से मार्निंग सिकनेसचा सामना करीत असल्याने तिला सातत्याने ओमेटिंग होत आहेत. बियॉन्से जुळ्या मुलांना जन्म देणार असून, ...
मार्निंग सिकनेसने त्रस्त झाली गर्भवती बियॉन्से
गर्भवती गायिका बियॉन्से मार्निंग सिकनेसचा सामना करीत असल्याने तिला सातत्याने ओमेटिंग होत आहेत. बियॉन्से जुळ्या मुलांना जन्म देणार असून, सध्या तिला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या प्रसूतिदरम्यान बियॉन्सेला एवढा त्रास सहन करावा लागला नाही. त्या तुलनेत आता तिला प्रचंड वेदना होत आहेत. कदाचित जुळ्या मुलांमुळे तिला या वेदना होत असाव्यात. याविषयी बियॉन्सेने सांगितले की, पहिल्या गर्भावस्थेत अन् दुसºया गर्भावस्थेत खूपच फरक आहे. काही मुलगी ब्लू आयवीला जन्म देताना मला फारशा वेदना झाल्या नाहीत. मात्र आता मला प्रचंड वेदना सोसाव्या लागत आहेत. हॉलिवूडलाइफ डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा बियॉन्सेने मुलगी ब्लू आयवीला जन्म दिला तेव्हा तिला अजिबात वेदना जाणवल्या नाहीत. मात्र आता तिला होणारा त्रास असह्य आहे. ओमेटिंगमुळे बियॉन्सेला सर्वाधिक त्रास होत आहे. त्यामुळे तिला अशक्तपणा जाणवत असून, चक्कर आल्यासारखे होत आहे. त्याचबरोबर तिच्या खानपानावरदेखील याचा परिणाम झाला आहे. सारख्या उलट्या अन् चक्कर येत असल्याने ती स्वत:ला खूपच अशक्त समजत आहे. अशाकाळात डॉक्टरांनी तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून, यात होणारा त्रास ही कॉमन बाब असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच बियॉन्सेने बेबी बंप दाखविणारे फोटोशूट केले होते. त्यानंतर ग्रॅमी अवॉर्डमध्ये जबरदस्त परफॉर्म करून सगळ्यानाच आश्चर्यचकित केले होते. यावेळी बियॉन्सेने केलेला डान्स विशेष चर्चेतही राहिला होता. मात्र आता तिला विश्रांती घेण्याची एकप्रकारे ताकीदच दिली गेल्याने बियॉन्से पुढील काही दिवस सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसणे मुश्कील असल्याचे सूत्रांनी सांगितले.