Join us  

चोरी पकडल्या गेली अन् फादर न बनता अभिनेता बनला टॉम क्रूज!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 12:28 PM

हॉलिवूडचा सगळ्यांत हँडसम स्टार टॉम क्रूज याचा ‘मिशन इम्पॉसिबल फॉलआऊट’ हा चित्रपट आज जगभरात प्रदर्शित झाला. टॉमच्या धमाकेदार अ‍ॅक्शन फिल्म सीरिजचा हा सहावा चित्रपट आहे. भारतातही टॉमची क्रेज कमी नाही. भारतात उद्या हा चित्रपट रिलीज होईल.

हॉलिवूडचा सगळ्यांत हँडसम स्टार टॉम क्रूज याचा ‘मिशन इम्पॉसिबल फॉलआऊट’ हा चित्रपट आज जगभरात प्रदर्शित झाला. टॉमच्या धमाकेदार अ‍ॅक्शन फिल्म सीरिजचा हा सहावा चित्रपट आहे. भारतातही टॉमची क्रेज कमी नाही. भारतात उद्या हा चित्रपट रिलीज होईल. बॉलिवूड जाणकारांचे मानाल तर पहिल्या दिवशी हा चित्रपट १० कोटी रूपयांपर्यंत ओपनिंग देईल. ‘मिशन इम्पॉसिबल’सीरिजच्या याआधीच्या चित्रपटाने भारतात ८ कोटींची ओपनिंग दिली होती. ‘मिशन इम्पॉसिबल फॉलआऊट’ हा या सीरिजचा पहिला चित्रपट आहे, ज्याचे शूटींग ‘रिअल ३डी’मध्ये झाले आहे. टॉमशिवाय यात हेन्री केविल, रेबेक फर्ग्यसन, विंग रेम्स आदी स्टार आहेत.‘मिशन इम्पॉसिबल’ सीरिज भारतात प्रचंड लोकप्रीय राहिली होती. याच्या एका चित्रपटात बॉलिवूडस्टार अनिल कपूरही दिसला होता. आज टॉम क्रूज ५५ वर्षांचा आहे. पण त्याच्या चेहऱ्यावर त्याचे वय जराही दिसत नाही.आॅस्करसाठी तिनदा नॉमिनेट झालेला आणि तीनदा गोल्डन ग्लोब अवार्ड जिंकणारा टॉम जगातील सगळ्यांत हँडसम स्टार म्हणून ओळखला जातो. २०१२ मध्ये तो हॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा स्टार ठरला होता. तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल की, टॉमने वयाच्या १२ व्या वर्षांपर्यंत १५ शाळा बदलल्या होत्या. वयाच्या १२ व्या वर्षी पॉकेट मनी वाचवून त्याने या पैशातून मोटरसायकल खरेदी केली होती. शाळेत असताना त्याला हॉकी खेळायला प्रचंड आवडे. पण एकदा खेळताना त्याचा दात तुटला आणि त्यानंतर टॉमने हॉकी खेळणे सोडून दिले. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण एकेकाळी बेस्ट रेसलर म्हणूनही तो ओळखला जायचा. चित्रपटांप्रमाणे त्याचे खासगी आयुष्यही हिरोपेक्षा कमी नाही. १९९६ मध्ये एक महिला रस्त्यावर जखमी पडलेली त्याला दिसली. तो लगेच त्या महिलेला रूग्णालयात घेऊन गेला. केवळ इतकेच नाही तर तिच्या उपचाराचा सर्व खर्च त्याने उचलला.टॉम कॅथलिक कुटुंबात वाढला. याचा परिणाम म्हणजे, १४ व्या वर्षी फादर बनण्याच्या इच्छेने त्याच्या मनात जन्म घेतला होता. पण एक दिवस फादरच्या खोलीतून दारू चोरताना तो पकडला गेला आणि त्याला फ्रान्सिस्कन सेमिनरी स्कूलमधून बाहेर काढण्यात आले.टॉम क्रूजने तीन लग्न केलीत. त्याची प्रत्येक पत्नी आधीपेक्षा ११ वर्षांनी लहान होती. १९८७ मध्ये त्याने मिमी रॉजर्ससोबत लग्न केले़ १९९० मध्ये निकोल किडमॅनसोबत आणि २००६ साली केटी होल्मससोबत. सध्या टॉम एकटा आहे. त्याचे तिसरे लग्न केवळ पाच वर्षे टिकले. टॉमने केटीला आयफेल टॉवरवर प्रपोज केल. होते़ मग दोघांनी एका चर्चमध्ये लग्न केले होते. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटात राजची भूमिका साकारण्यासाठी टॉपच्या नावाचा विचार झाला होता. पण नंतर या भूमिकेसाठी शाहरूख खानची निवड झाली.

टॅग्स :हॉलिवूड