Join us

मिरेन स्वत:ला सेक्सी समजत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 20:59 IST

एका जमान्यात आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणाºया हॉलिवूड अभिनेत्री डेम हेलेन मिरेन मात्र स्वत:ला सेक्सी समजत नाही. जेव्हा तिला ...

एका जमान्यात आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणाºया हॉलिवूड अभिनेत्री डेम हेलेन मिरेन मात्र स्वत:ला सेक्सी समजत नाही. जेव्हा तिला याविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने स्पष्ट शब्दात मी सेक्सी नसल्याचे सांगत स्वत:ला कधीही सेक्सुअल आॅब्जेक्ट समजत नसल्याचे सांगितले. ७१ वर्षीय मिरेन नेहमीच पार्टी तसेच इंडस्ट्रीशी संबंधित इतर समारंभात शरीरभर कपडे परिधान करून येणाºया अभिनेत्रींमध्ये ओळखली जाते. यावरून तिच्यावर बºयाचदा टीका केली गेली. मात्र काहींनी या कपड्यांमध्ये तिचे सौंदर्य अधिक उठून दिसत असून, ती खूपच सेक्सी दिसत असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या. यालाच उत्तर देताना हेलेन मिरेनने म्हटले की, चांगले दिसणे आणि सेक्सी दिसणे यात फरक आहे. जे लोक सेक्सी या नजरेतून बघतात, ते त्या व्यक्तीला सेक्स सिम्बॉल म्हणून बघतात. फिमेलफर्स्ट डॉट को डॉट यूकेने दिलेल्या माहितीनुसार मिरेनने स्वत:ला कधीच सेक्सी समजले नाही. मिरेन याविषयी काय विचार करतेय याची माहितीही या वेबसाइटने प्रसिद्ध केली. जेव्हा एखादी पेंटिंग तुमच्या मनाला भावते तेव्हा तुमच्या तोंडून लगेचच ‘ओ माय गॉड... पेंटिंग किती सेक्सी आहे’ असे शब्द बाहेर पडतात. याचा अर्थ तुम्हाला त्या पेंटिंगसोबत सेक्स करायचा आहे, असा होत नाही. त्यामुळेच जेव्हा लोक मला सेक्सुअल आॅब्जेक्ट असे संबोधतात तेव्हा मी त्यांचा कठोर शब्दात विरोध करतेय. मी त्यांना शब्द शब्दात मी अशी नसल्याचे सांगतेय. मला अशाप्रकारची प्रतिक्रिया कधीच आवडत नसल्याचेही तिने सांगितले.