Join us
Daily Top 2Weekly Top 5

किमला दरोड्याच्या ‘आप बिती’साठी लाखो डॉलर्सची आॅफर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 21:21 IST

टीव्ही स्टार किम कर्दाशियनवर पॅरिस येथे झालेल्या दरोड्याच्या घटनेतून तीन अजुनही सावरली नसताना, तिची ही आप बिती मुलाखतीतून लोकांपर्यंत ...

टीव्ही स्टार किम कर्दाशियनवर पॅरिस येथे झालेल्या दरोड्याच्या घटनेतून तीन अजुनही सावरली नसताना, तिची ही आप बिती मुलाखतीतून लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी तिला लाखो डॉलर्सच्या आॅफर्स येत आहेत. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, किपींग विथ द कर्दाशियन शोच्या निर्मात्यांकडूनच तिला ही आॅफर दिली गेली आहे. मात्र यावर किमने अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिलेले नाही. या शोच्या आॅफर्सची चर्चा होताच अमेरिकेतील एका आघाडीच्या वर्तमानपत्रानेही किमला मुलाखतीसाठी लाखो डॉलर्सची आॅफर दिली आहे. विशेष म्हणजे तिच्या आवडत्या पत्रकारानेच तिची मुलाखत घ्यावी याबाबतची सवलतही तिला देण्यात आली आहे. पॅरिसमधील हॉटेलमध्ये किम कर्दाशियनची दरोडेखोरांनी लुट केली होती. बुरखाधारी दरोडेखोरांनी तिच्या डोक्यावर बंदुक ठेवून तिला लुटले होते. यात तिच्याकडचे लाखो डॉलर्सचे दागिने लंपास करण्यात आले होते. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर किम प्रचंड घाबरली होती. माध्यमांसमोर बोलताना ती म्हणाली, मला भिती होती की दरोडेखोर माझा बलात्कार करतील. किमसोबत झालेली ही घटना सेलिब्रिटी जगतात वाºयासारखी पसरली होती. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या सुरक्षेत वाढही केली होती. मात्र किमची ही आप बिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी माध्यमे उत्सुक आहेत. दरोड्यानंतर ज्या पद्धतीने किमने याविषयी प्रतिक्रिया नोंदविली होती, त्यावरून तिची मुलाखत भन्नाट होईल, प्रेक्षक तथा वाचकांमध्ये तुफान लोकप्रिय ठरेल या हेतुने सध्या विविध माध्यमे तिचा पिच्छा पुरवित आहेत. तिच्या एका मुलाखतीसाठी लाखो रुपयांच्या डॉलर्सची तिला आॅफर दिली जात आहे. परंतु अद्यापपर्यंत किमकडून या आॅफर्सवर विचार केला गेला नसल्याने माध्यम जगतात निराशा आहे.