Join us

मायलीला आवडत नाही तिची ‘8 कोटीं’ची रिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 16:21 IST

पॉप स्टार मायली सायरस जरा अजबच मिश्रण आहे. मुलींची सर्वात आवडती गोष्ट कोणती असेल तर ते म्हणजे दागिने. त्यातल्या ...

पॉप स्टार मायली सायरस जरा अजबच मिश्रण आहे. मुलींची सर्वात आवडती गोष्ट कोणती असेल तर ते म्हणजे दागिने. त्यातल्या त्यात डायमंड ज्वेलरी तर मुलींचा जीव की प्राण. असे असताना मायलीला तिच्या एंगेजमेंटची रिंग आवडत नाही.बरं ही रिंग काही साधी-सुधी नाही. या ३.५ कॅरेटच्या डायमंड रिंगची किंमत एक मिलियन पौंड (८.१ कोटी रु.) एवढी प्रचंड आहे. बॉयफ्रेंड लियाम हेम्सवर्थने तिला ही रिंग देऊन लग्नासाठी मागणी घातली होती. मात्र, मायलीला ही रिंग काही फारशी रुचली नाही.तिच्या मते, ही रिंग तिच्या इतर फंकी ज्वेलरीसोबत नीट मॅच होत नाही. नुकतेच तिने ‘दी एलेन डीजेनेरस शो’मध्ये याबाबत खुलासा केला. ती म्हणाली की, ‘मलाच आश्चर्य वाटते की, मला इतकी चांगली रिंग आवडत नाही. माझी स्टाईल जरा वेगळी असल्याने कादचित मला असे वाटत असावे.’एंगेजमेंटच्या विषयावर मायली तसे जास्त बोलत नाही परंतु या शोमध्ये तिने अनेक नवे खुलासे केले. ती म्हणाली की, लियामसोबत एंगेजमेंट करून मी खूप खुश आहे. पण याचा अर्थ असा नाही की, मी लग्नसुद्धा करेन. आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत आयुष्य व्यतीत करण्यासाठी लग्नच करावे लागते असे नाही.लियाम हेम्सवर्थ - मायली सायरसबोलता बोलता ती असेही म्हणाली की, ‘समलैंगिक विवाहाला मान्यता मिळावी मी म्हणून प्रयत्न करते पण मी स्वत:च लग्न करू इच्छित नाही.’ बघा कसा विरोधाभास आहे!मायली आणि लियाम २००९ साली ‘द लास्ट साँग’ या चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. मे २०१२ साली त्यांची एंगेजमेंट झाल्यावर ते एकाच वर्षानंतर ते वेगळे झाले होते. पण लगेच काही ते पुन्हा एकत्र आले.