Miley Cyrus Wedding : ट्रम्पच्या अमेरिकेत मायली सायरस करणार नाही लग्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 12:48 IST
आपल्याकडे जसे सलमान खानचे लग्न कधी होणार हा गहन प्रश्न आहे तसाच हॉलीवूडमध्ये मीडिया व चाहत्यांसाठी सिंगर मायली सायरस ...
Miley Cyrus Wedding : ट्रम्पच्या अमेरिकेत मायली सायरस करणार नाही लग्न!
आपल्याकडे जसे सलमान खानचे लग्न कधी होणार हा गहन प्रश्न आहे तसाच हॉलीवूडमध्ये मीडिया व चाहत्यांसाठी सिंगर मायली सायरस तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न कधी करणार हा ‘गंभीर’ मुद्दा आहे. मायली आणि तिचा दीर्घकाळापासूनचा बॉयफ्रेंड लियाम हेम्सवर्थचे बऱ्याच वर्षांपासून रखडलेले आहे.हा मुद्दा लांबतच असताना या वर्षी तरी त्यांचे लग्न होणार का? हा तिच्या जगभरातील चाहत्यांना प्रश्न पडला होता. तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर एक शॉकिंग बातमी आमच्याकडे आहे. मायली अजून किमान चार वर्षे तरी लग्न करणार नाहीए. हे आम्ही नाही तर ती स्वत: म्हणतेय.बरं तिचे लग्न न करण्याचे कारण ऐकले तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. जोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प अमेरिके चे अध्यक्ष आहेत तोपर्यंत ती लग्न करणार नसल्याचे तिने घोषित केले आहे. शुक्रवारी (दि. २०) ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष म्हणून शपथ ग्रहण केली. हिलरी क्लिंटन यांचा नोव्हेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकांमध्ये पराभव करून त्यांनी व्हाईट व्हाऊसमध्ये जागा मिळवली होती.► ALSO READ: मायलीला आवडत नाही तिची ‘8 कोटीं’ची एंगेजमेंट रिंग!ट्रम्प यांच्या विजयामुळे अनेक जण नाराज आहेत. त्यांपैकी एक म्हणजे ‘द रेकिंग बॉल’ गायिका मायली सायरसदेखील आहे. ट्रम्प यांची कट्टर विरोधक म्हणून ती ओळखली जाते. आता ते अधिकृत राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे त्यांच्या ‘राजवटी’मध्ये लग्न न करण्याचा निर्णय तिने घेतला आहे.तिच्या जवळच्या एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘ट्रम्प यांच्यामुळे अनेक लोक भीतीच्या सावटाखाली जगत आहे. त्यांच्या वेदना, दु:खाला आवाज आणि दडपशाहीला विरोध म्हणून ती ट्रम्पच्या अमेरिकेत लग्न करणार नाही. तिला लग्नापेक्षा इतर महत्त्वाच्या सामाजिक प्रश्न व विषयांवर काम करायचे आहे. जेव्हा ट्रम्प व्हाईट हाऊसमधून बाहेर पडतील तेव्हाच ती लग्नाचा विचार करणार आहे.’विशेष म्हणजे गेल्या वर्षी तिने म्हटले होते की, ‘ट्रम्प जिंकून आल्यास मी देश सोडून जाईल.’ पण नंतर तिने घुमजाव करत मी पळून नाही जाणार, येथे थांबूनच व्यवस्थेशी लढा देणार, असा निर्धार केला होता. मायली नेहमीच सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत असते आणि चळवळींमध्ये सहभागी होते. ‘माझ्या स्टारडमचा उपयोग जर लोकांच्या चांगल्यासाठी होणार असेल तर मी तो नक्की करणार, अशी तिची पक्की समजूत आहे.► ALSO READ: लियामसोबत एका चित्रपटात काम करू इच्छिते मायली सायरस