मायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 20:09 IST
किंग आॅफ पॉप नावाने जगभरात प्रसिद्ध असलेला दिवंगत अमेरिकी गायक आणि डान्सर मायकल जॅक्सनची मुलगी पॅरिस जॅक्सन ही लेस्बियन ...
मायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली!
किंग आॅफ पॉप नावाने जगभरात प्रसिद्ध असलेला दिवंगत अमेरिकी गायक आणि डान्सर मायकल जॅक्सनची मुलगी पॅरिस जॅक्सन ही लेस्बियन असल्याचे समोर आले आहे. ब्रिटिश ग्लॅमरस मॉडेल आणि अभिनेत्री कारा डेलेवेनसोबत तिचे समलैंगिक नाते असून, याबाबतची कबुली स्वत: १९ वर्षीय पॅरिस जॅक्सनने दिली आहे. पॅरिसचा भाऊ प्रिंसने याविषयी आपल्या मित्रांना सांगताना म्हटले की, जर आज माझे वडील मायकल जॅक्सन जिवंत असते तर मुलीच्या निवडीवर त्यांना गर्व वाटला असता. रडार आॅनलाइनने दिलेल्या माहितीनुसार, प्रिन्सने म्हटले की, माझ्या वडिलांना यावर नक्कीच गर्व वाटला असता की, त्यांची मुलगी तिची वाट स्वत:च ठरवित आहे. वास्तविक सुरुवातीपासूनच ती असे करीत आली आहे. याविषयी वडील मायकल जॅक्सनीच तिला शिकवण देताना म्हटले होते की, प्रेमाची कुठलीही सीमा नसते. ज्यामध्ये लिंग आणि वंश गौण आहे. दरम्यान, पॅरिस आणि काराचे संबंध बºयाच काळापासून आहेत, ज्याबाबतचा खुलासा आता समोर आला आहे. त्या दोघीही एकमेकींसोबत आनंदी आहेत. तसेच जॅक्सन परिवारही पॅरिसच्या निवडीवर खूश आहेत. गेल्या आठवड्यातच पॅरिस आणि कारा एकमेकींना किस करताना बघावयास मिळाले होते. या दोघी त्यावेळी त्यांच्या डबल डेटवर होत्या. त्यांच्यासोबत मॅकॉले किल्क आणि त्याची गर्लफ्रेंड ब्रेंडा स्ट्रान्ग हेदेखील उपस्थित होते. पॅरिस जॅक्सनने आठवडाभरापूर्वीच आपल्या इन्स्टाग्रामवर तिचा आणि डेलेवेनचा एक व्हिडीओ अपलोड केला होता. ज्यामध्ये दोघी एकत्र स्ट्रॉबेरी खाताना आणि २०१५ मध्ये आलेला ‘कॅरल’ या चित्रपट बघताना दिसत होत्या. हा चित्रपट लेस्बियन संबंधांवर आधारित आहे. दरम्यान, दोघींची भेट २०१७ मध्ये झाली होती. एमटीव्ही मुव्ही आणि टीव्ही अवॉर्ड्सच्या फंक्शनमध्ये दोघी एकत्र आल्या होत्या. येथूनच पुढे दोघींच्या भेटीगाठी वाढल्या.